अर्जेंटिनात कोकेनमधील भेसळीमुळे २० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ७५ हून अधिक नागरिकांना त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील १८ जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असा घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीने दुस-या टोळीची बदनामी करण्यासाठी कोकेनमध्ये भेसळ केली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत २० जणांना यामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.
(हेही वाचा – यूपीत शिवसेनेने पाठिंबा दिलेला उमेदवार चप्पलेचा हार घालून फिरतोय!)
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचे सेवन करु नये. तसेच मागील २४ तासांत खरेदी केलेले अंमली पदार्थ फेकून द्यावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे भेसळयुक्त अंमली पदार्थ बाजारात किती प्रमाणात उपलब्ध आहेत याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community