धक्कादायक! वन्यजीवांच्या शिकारीकरता गुन्हेगारांसाठी लॉकडाऊन ठरली ‘संधी’

148

कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत दीर्घ काळ देशात लॉकडाऊन होता. हीच संधी साधत शिका-यांनी वन्यजीवांची हत्या केल्याची धक्क्यदायक बाब उघडकीस आली आहे. वन्यजीवांची कातडी, हाडे सांभाळून दैनंदिन जीवन पुन्हा सुरु झाल्यानंतर आता हळूहळू वन्यजीवांच्या अवैध विक्रीचे प्रमाण वाढू लागल्यानंतर गुन्हेगारांसाठी लॉकडाऊन फायदेशीर ठरत असल्याची कबुली देत आहेत.

दोन दिवसांत तब्बल ११ आरोपींना पकडले

नुकतीच शहापूर येथील वनविभागाकडून बिबट्याच्या कातडीची अवैध विक्री रोखली गेली. गेल्या दोन दिवसांत तब्बल ११ आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले. त्यापैकी बिबट्याची कातडी कापणा-या चोराने हा गुन्हा मागील दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळात केल्याची कबुली दिली. कातडी दोन वर्ष सांभाळल्यानंतर आता कोरोनातून बाहेर पडत दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या भागांतील आपल्या खब-यांकडून बिबट्याच्या कातडीच्या विक्रीसाठी ग्राहक शोधायला सुरुवात केली आणि वनविभागाला या अवैध विक्रीची खबर लागली.

अधिकारी बनले बनावट ग्राहक

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून आरोपींच्या संपर्कात वनविभागातील अधिकारी व प्राणीमित्र आले. या दोघांनीही आपण बनावट ग्राहक असल्याचा विश्वास आरोपींच्या मनात तयार केला. शहापूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी व  प्राणीमित्र संतोष जगदाळे हे बनावट ग्राहक बनून आरोपींच्या संपर्कात आले. १९ जानेवारी रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी आणि प्राणीमित्र संतोष जगदाळे यांची भेटही झाली. त्यावेळी मोबाईलवरील बिबट्याच्या कातडीचा व्हिडिओ दाखवून दोन्ही गटांतून व्यवहार पक्का झाला.

(हेही वाचा व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे!)

व्यवहारासाठी वनविभागाची हद्द बदलते

व्यवहार पक्का झाल्यानंतर प्रत्यक्षात विक्री ही वनविभागाच्या टीमच्या हद्दीत करणे सराईत गुन्हेगार कटाक्षाने टाळतात. सतत ठावठिकाणे बदलत दुस-या ठिकाणच्या वनविभागातील हद्दीत विक्री करतात. मात्र याबाबतची सूतराम कल्पना ग्राहकांना दिली जात नाही. दुस-या हद्दीत विक्री पकडली गेल्यास हद्दीच्या वादातून वनविभागातील दोन शाखांमध्येही वाद उद्भवतो. दुस-या हद्दीतील वनाधिकारी आरोपींच्या वर्तुळातला निघाल्यास आरोपींच्या शिक्षेची तरतूद कमी होण्याची दाट शक्यता असते. हाच प्रकार बिबट्याची विक्री करताना शहापूर ऐवजी आरोपींनी अचानक ठिकाण बदलून नाशिक मार्गावर ग्राहकांना बोलावले.

बिबट्याच्या कातडीसह रंगेहाथ आरोपींना पकडले

बुधवारी २ फेब्रुवारीला व्यवहाराची तारीख ठरली. आरोपींनी सुरक्षेच्या कारणास्तव दोनदा ठिकाणेही बदलली. अखेर बनावट ग्राहकांसह मौजे उभाडे गावाजवळीत घोटी सिन्नर भागांत बिबट्याच्या कातडीचा व्यवहार सुरु असताना वनविभागाच्या टीमने आरोपींना रंगेहाथ पकडले.

आरोपींची नावे 

  • नाशिक येथील इगतुपरीतील रहिवासी असलेल्या काळू भगत (३६)
  • पालघर येथील जव्हार येथील मोखाड्यात राहणारा रघुनाथ सातपुते (३४)
  • नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमधील  अस्वली येथील मुकुंदा सराई (५५)
  • नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमधील सामोडीत राहणारा गोटीराम गवारी (३४)
  • नाशिक येथील इगतपुरीतील भवाली येथे राहणारा अशोक मेंगाळ (२९)
  • नाशिक येथील इगतपुरीतील भावली येथील फागुळगव्हाणमधील योगेश अंदाळे (२६)
  • ठाण्यातील शहापूरातील चाफ्याचा पाड्यात राहणारा अर्जून पानेडा (२८)

अन्य चार आरोपींबाबत वनविभागाने कमालीची गुप्तता पाळली आहे. या प्रकरणी अजून आरोपी जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न वनविभागाकडून सुरु आहेत. त्यामुळे सर्व आरोपींचा तपशील जाहीर करता येणार नाही, अशी स्पष्टोक्ती वनविभागाने दिली.

बिबट्याची शिकार केल्यास जाणून घ्या कोणती शिक्षा होईल

बिबट्या हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत पहिल्या वर्गवारीत संरक्षित आहे. बिबट्याच्या शिकारीची किंवा अवैध विक्रीची घटना सिद्ध झाल्यास आरोपींना सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. शिवाय पंचवीस हजारापर्यंत दंडही ठोठावला जाऊ शकतो.

(हेही वाचा आता मध्य रेल्वेचा 72 तासांचा जम्बो मेगाब्लाॅक! जाणून घ्या कोणत्या ट्रेन रद्द?)

कारवाईचे वनविभागाचे पथक –

एन.एस.श्रावणे (वनपाल), व्हि.एस.गायकवाड (वनपाल),एस. बी.गाठे (वनपाल), वाय.पी.पाटील (वनरक्षक), पी.डी.बेलदार (वनरक्षक), जी.एस.भोपे (वनरक्षक), जी.एस.भौये (वनरक्षक), एस.एल.शिंदे (वनरक्षक), बी.पी.वसावे ( वनरक्षक ), एस.एस.अहिरे (वनरक्षक), डी.डी. ठोंबरे (वनरक्षक), यु.एम.घायवट (वनरक्षक), बी.एस.शेळके (वनरक्षक), व्ही.व्ही.खेडकर (वनरक्षक), आर.एन.मागी (वनरक्षक), जी.एस.खेमनर (वनरक्षक), एस.डी.धोंगडे (वनरक्षक), एम.टी. औतडे (वनरक्षक), डी.पी.ऐवळे (वनरक्षक), सी.एस.खाडे (वनरक्षक), आर.एन.देवकत्ते (वनरक्षक), आर.एस. महाले (वनरक्षक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.