टाटा पॉवर आणि भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी असलेल्या अपोलो टायर्स लिमिटेडने भारतभरात सार्वजनिक चार्जिंग स्थानके उभारणीसाठी धोरणात्मक भागीदारी करत असल्याचे जाहीर केले आहे.
सर्वांसाठी चार्जिंग स्थानके खुली
ही चार्जिंग स्थानके देशभरात पसरलेल्या अपोलो टायर्सच्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागांत असतील. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग परिसंस्थेच्या सर्व विभागांत टाटा पॉवर कार्यरत आहे आणि डीसी ००१, एसी, टाईप २, ५० किलोवॅट पर्यंतचे फास्ट डीसी चार्जर्स आणि त्या ठिकाणी असलेल्या बसेससाठी २४० किलोवॅट पर्यंतचे चार्जर्स त्यांच्याकडे आहेत. या विविध चार्जर्सच्या वर्गीकरणामुळे अनुक्रमे दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगला गती मिळेल. अपोलो टायर्स आणि टाटा पॉवरमध्ये असलेल्या करारानुसार, टाटा पॉवर सुरुवातीला अपोलो टायर्सच्या सीव्ही आणि पीव्ही झोन्सच्या १५० ब्रँडेड रिटेल आऊटलेटमध्ये चार्जिंग स्थानके उभारेल. या टायरच्या दालनांत येणाऱ्या ग्राहकांच्या जोडीलाच वर्षभर सर्वसामान्य जनतेसाठीही ही चार्जिंग स्थानके वापरासाठी खुली राहतील.
( हेही वाचा: बंडातात्या कराडकरांची पोलिसांकडून चौकशी! आता पुढे काय? )
बांधिलकी प्रतीत होते
टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.प्रवीण सिन्हा म्हणाले, “भारतभरातील आपल्या व्यावसायिक आणि प्रवासी वाहन विभागांत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी अपोलो टायर्स बरोबर भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची परिसंस्था विकसीत करण्यासाठी आणि विस्तारासाठी आमची असलेली बांधिलकी या भागीदारीतून प्रतीत होते.”
पायाभूत सुविधा उभारणार
या भागीदारीविषयी बोलताना अपोलो टायर्सच्या आशिया पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिका विभागाचे अध्यक्ष सतीश शर्मा म्हणाले, “भारतातील टायर आणि वाहन क्षेत्रांत आम्ही उचललेल्या अनेक पहिल्या चालींपैकी ही एक आहे. आमच्या व्यावसायिक भागीदाराच्या आवारात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीची पायाभूत सुविधा उभारणे ही गोष्ट देशात हरित दळणवळणाला चालना देण्याच्या आमच्या ध्येयाला बळकटी आणणारी आहे. टाटा पॉवरच्या प्रचंड मोठ्या सर्व्हिस नेटवर्कमुळे सर्व ठिकाणी विना अडथळा चार्जिंग सुविधा मिळू शकेल याबद्दल आम्हांला खात्री आहे.
Join Our WhatsApp Community