वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर नीट परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर १२ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात आली व कालांतराने या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. आता सध्या देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. परंतु मुंबईतील जे.जे. रुग्णालयात विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या अध्यापकांच्या संपाचा परिणाम मुलांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी सकाळी ९ वाजता आलेले विद्यार्थी रात्री ९ वाजता घरी जात आहेत. परिणामी या सर्व कामकाजाचा भार प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांवर येत आहे.
MSMTचे अध्यक्ष व उप अधिष्ठाता एकनाथ पवार, डॉ. अबिचंदानी वैयक्तिक रजेवर आहेत. डॉ. अन्सारी यांना नोडल अधिकारी नेमले असून ते आपला वेळ प्रवेश प्रक्रियेसाठी देत नाहीत. त्यामुळे सर्व भार मुख्य प्रशासकीय अधिकारी सोनावणे यांच्यावर पडला असून त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली आहे.
( हेही वाचा : आता फास्टॅगही होणार बंद? जाणून घ्या कशी होणार टोलवसुली )
डॉक्टरांचा संप
१२० दिवसांच्या तात्पुरत्या सेवेत असलेले डॉक्टर नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी आग्रही आहेत. तर इतर पूर्णवेळ सेवेत असलेले डॉक्टर बढती मिळावी याकरता संप करत आहेत. या अध्यापकांच्या संपाचा परिणाम मुलांच्या प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. १२० दिवसांच्या तात्पुरत्या सेवेत असलेले अध्यापक मुलांच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी येत नाहीत, कारण ते संपात सहभागी आहेत, यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी सकाळी आलेले विद्यार्थी रात्री घरी जातात. तसेच जबाबदार अध्यक्ष, उप-अधिष्ठाता वैयक्तिक रजेवर असल्याने डॉक्टरांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या कामकाजाचा सर्व भार कर्मचाऱ्यांवर आलेला आहे.
संपकरी डॉक्टरांच्या मागण्या
वैद्यकीय MPSC परीक्षा तात्काळ घेण्यात यावी, बढती मिळावी, १२० दिवसांच्या तात्पुरत्या सेवेत असलेल्या डॉक्टरांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, कारण या डॉक्टरांना सद्यस्थितीत कॉन्ट्रॅक्ट (contract) स्वरुपात रुजू केले असून त्यांच्या वेतनातही कपात झालेली आहे, या प्रमुख मागण्यांसाठी जे जे रुग्णालयात डॉक्टरांचा संप सुरू आहे.
( हेही वाचा : टाटा चार्जिंग सेंटर कुणाच्या माध्यमातून उभारणार? जाणून घ्या… )
प्रवेश प्रक्रियेवर परिणाम
विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी नेमून दिलेले अधिकारी उपस्थित नाहीत. डॉ. अन्सारी यांना नोडल अधिकारी नेमले असून ते आपला वेळ प्रवेश प्रक्रियेसाठी देत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून याचा संपूर्ण भार कर्मचाऱ्यांवर पडत आहे.
Join Our WhatsApp Community