आता फास्टॅगही होणार बंद? जाणून घ्या कशी होणार टोलवसुली

165

टोल नाक्यावरच्या वाहनांच्या मोठाल्या रांगा कमी करण्यासाठी, तसेच मोठ्या रागांमुळे केंद्र सरकारने फास्टॅग आणला होता. मात्र आता हा फास्टॅग बंद होणार असून तो इतिहास जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्र सरकार वाहनांवरील फास्टॅग हटवणार असून मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. वाहनावर फास्टॅग असूनही अनेकदा टोल नाक्यावर अडचणी येत होत्या आणि त्याचा मनस्ताप वाहन चालकांसह टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना होत होता. मात्र आता परिवहन आणि पर्यटनसंदर्भातील संसदीय समितीने फास्टॅग काढण्याची शिफारस केली आहे. पण वाहनांवरील हा फास्टॅग बंद केल्यानंतर वाहनांकडून टोलची वसुली कशी केली जाणार ते जाणून घ्या…

बुधवारी संसदेत राष्ट्र निर्माणातील राष्ट्रीय महामार्गाची भूमिका याबद्दलचा अहवाल परिवहन आणि पर्यटनाशी संबधित स्थायी समिती अध्यक्ष टी.जी व्यंकटेश यांनी सादर केला. केंद्र सरकार टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित व्यवस्था लागू करणार असून हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे देशभरात राष्ट्रीय महामार्गावर टोलचे पैसे गोळा करण्यासाठी टोल प्लाझा नाके उभारावे लागणार नाहीत, त्यामुळे प्रकल्पांवर होणारे खर्च कमी होण्यास मदत होईल, असे व्यंकटेश यांनी अहवाल सादर करताना सांगितले.

मग टोल वसुली कशी होणार…

आता वाहनांचा फास्टॅगही बंद होणार असल्याने टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाच्या वापर होणार आहे. त्यामुळे टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होईल. वाहतूक कोंडीचा त्रास कमी झाल्याने वाहनांच्या इंधनाची बचत होईल. यासोबतच वेळ ही वाचण्यास मदत होईल. जीपीएस तंत्रज्ञान लावण्याने वाहन चालकांच्या बँक खात्यातून थेट पैसे वजा होणार आहे, त्यामुळे वाहनांवर फास्टॅग लावण्याची गरज भासणार नाही.

(हेही वाचा – टाटा चार्जिंग सेंटर कुणाच्या माध्यमातून उभारणार? जाणून घ्या…)

जीपीएस आधारित टोल वसुलीची व्यवस्था लागू करण्यासाठी सल्लागाराची नियुक्त करायची आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याने सरकारने सांगितले. देशभरात जीपीएस व्यवस्था लागू करण्यासाठी रोडमॅप करण्याचे काम सल्लागार समितीचे असणार आहे, असेही सरकारकडून सांगितले. वाहनावर फास्टॅग अजूनही अनेकदा टोल नाक्यावर अडचणी येत आहेत. टोल नाक्यावरील सेन्सरला फास्टॅग रिड होत नसल्याने टोल नाक्यावर वाद होत आहे. मात्र हा प्रश्न सुटणार असून वाहतूक वेगवान होण्यास मदत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.