पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा पुतण्या भुपिंदर सिंग हनी यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेतले आहे.
आम आदमी पक्षाकडून राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी
पंजाबच्या मोहालीतील अवैध वाळू उत्खनन प्रकरणातील मुख्य आरोपी भूपिंदरसिंग हनी याच्या मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या होत्या. अंमलबजावणी संचालनालयाने टाकलेल्या छाप्यांमध्ये भूपिंदरसिंग हनीच्या निवासास्थानातून 3.9 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. या छाप्यांमधून आतापर्यंत सुमारे 10.7 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे चन्नी विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाने तर राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे. यानंतर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आम आदमी पार्टीचे पंजाबचे सह-प्रभारी राघव चड्ढा यांनी दिलेल्या तक्रारीवर कारवाई करत, राज्याचे डीजीपी यांना मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावरील आरोपांचा अहवाल देण्याचे निर्देश दिले.
(हेही वाचा बंडातात्या कराडकरांची पोलिसांकडून चौकशी! आता पुढे काय?)
Join Our WhatsApp Community