दरमहा एवढी बचत करू शकते तुम्हाला लखपती! वाचून थक्क व्हाल…

107

अलिकडच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. प्रत्येकजण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सेव्हिंग करत असतो. दरम्यान आजकालच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जिथे धोका कमी तिथे सुरक्षित उत्पन्नाची हमी मिळते. पण या पारंपरीक सेव्हिंग योजनांमध्ये कमी व्याजदर मिळतो. याला पर्याय म्हणून म्युच्युअल फंड (Mutual fund) एसआयपीच्या अनेक योजना 12 ते 20 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत. परंतु या एसआयपीमध्ये तुम्हाला जास्त रिस्क घ्यावी लागेल.

12 टक्के परतावा

एसआयपीमध्ये दर महिन्याला १हजार रुपांची गुंतवणूक केल्यास जवळपास 30 वर्षांनंतर तुम्हाला 20 टक्क्याने परतावा मिळू शकतो. दरमहा 1 हजार रुपयांची बचत करत तुम्ही करोडपती होऊ शकता. बँक आणि टपाल खात्यातील योजनेत रक्कम गुंतवल्यास लोकांना एवढ्या प्रमाणात फायदा होत नाही. तर 20 वर्षांत तुम्हाला 12 टक्के परतावा गृहित धरला तर 20 वर्षानंतर एकूण 9,99,148 म्हणजे जवळपास 10 लाख रुपये परत मिळतील.

( हेही वाचा : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘या’ स्थळांचं होणार सौंदर्यीकरण! )

ही गुंतवणूक 30 वर्षांसाठी केल्यास वाढीव दहा वर्षांचा हिशेब तुम्हाला थक्क करणारा असेल. दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक 12 टक्के परतावा लक्षात घेऊन एकूण 35 लाख 29 हजार 914 रुपये मिळतील. त्यामुळे तुम्ही ही अशाप्रकारे गुंतवणूक केल्यास निश्चित फायदा होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.