अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या चित्ररथाला पाॅप्युलर चाॅईस पुरस्कार

128

प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात 2022  पाॅप्युलर चाॅईस प्रकारात महाराष्ट्राच्या चित्ररथाची निवड झाली आहे. राज्याचे जैवविविधतेचे दर्शन घडविणारा ‘जैवविविधता मानके’ असा विषय महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथावर साकारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या चित्ररथाला पाॅप्युलर चाॅईस हा पुरस्कार घोषित केल्यानंतर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

विशेष गाण्याने आगमन

महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच जैवविविधता मानके दाखवण्यात आली होती. ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. सुमारे 15 प्राणी आणि 22 वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्ररथासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते.

अथांग सागर, रम्य किनारे सह्याद्रीचे उंचकडे

गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे

जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा

झाडे लावू झाडे जगवू, हाच आमुचा धर्म खरा

( हेही वाचा: अवघ्या दोन महिन्यांसाठी स्कूल बसच्या शुल्कात 30 टक्के वाढ! )

या शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेसह महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल झाला. या शब्दांचा प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या आवाजातील ही रचना आहे. हा चित्ररथ राजपथावर दाखल झाल्यानंतर, तिथे उपस्थित लोकांनी राज्याच्या समृद्ध जैवविविधतेचा वारसा अनुभवला. 2022 चा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची निवड झाली आहे. CISF ला CAPF सर्वोत्तम मॅचिंग तुकड्या म्हणून निवडण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.