कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची होतेय फसवणूक!

231

राज्यात गेल्या दोन ते महिन्यांपासून एसटी संपकऱ्यांचा संप अद्याप मिटण्याचे संकेत दिसत नाही. राज्यभरातील एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम आहेत. एसटी महामंडळातील नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपकरी कर्मचाऱ्यांनी त्यांचे या मागणीवर आंदोलन सुरू होते. या दरम्यान, एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान सुरू आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वारंवार परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाकडून लवकर सेवेत रूजू होण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशासनाच्या विनंतीनंतर अनेक जण कामावर परत आले. मात्र अजूनही अनेक जण संपावर आहेत. मात्र कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

रापम पैठण आगाराचे चालक एम डी सांगळे हे ०६ जानेवारीपासून कामगिरीवर हजर झालेले आहेत. मात्र त्यांच्या नावाने महामंडळाचे ३२५६८ कि.मी. रदद होऊन सुमारे १३,६७,६७० रु.चे नुकसान झाले आहे आणि त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत, अशा आशयाचे महामंडळाच्या नावाचे पत्र सोशल मीडियातून व्हायरल केले जात आहे. जेणेकरून हे पत्र वाचल्यानंतर जे कामगार सेवेत रूजू होऊ इच्छित आहे त्यांच्या मनात कारवाई संबंधी भिती निर्माण होईल. वास्तवात हे पत्र खरं नसून खोटं असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा -‘लालपरी’ची सेवा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

काय आहे नेमके प्रकरण

६ जानेवारीपासून रापम पैठण आगाराचे चालक एम डी सांगळे हे सेवेत रूजू झाले आहे. मात्र यानंतर त्यांच्या नावाने महामंडळाचे साधारण १३,६७,६७० रु.चे नुकसान झाले आहे आणि त्याला ते जबाबदार आहेत. या संदर्भात त्यांना ही नोटीस मिळाल्यापासून ४८ तासात त्यांनी आपला खुलासा करावा. अन्यथा त्यांच्यावर कार्यपध्दतीनुसार कारवाई करण्यात येईल. अशा आशयाचे पत्र व्हाटस अपसह सोशल मिडीयावर वायरल होत आहे. यानंतर महामंडळातील सेवेत रूजू होणाऱ्या किंवा असणा-या कर्मचा-यांना भिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारे आगारातील इतर दोन बनावट खुलासा पत्र तयार करुन चालक भुकन आणि वाहक जोगस यांच्या नावाने देखील तयार करुन व्हाटसअपवर वायरल करण्यात आले आहे.

असं आहे व्हायरल होणारं पत्र

Maharashtra aurangabad

कर्मचा-यांनी आत्महत्या करावी यासाठी षडयंत्र?

हे खुलासा पत्र पैठण आगाराने काढले नसतानांही काही संपकरी कर्मचा-यांनी खोटे बनावट पत्र तयार करुन पैठण आगार व्यवस्थापक यांच्या सहीच्या नमुनाचा वापर करुन व्हाटसअप ग्रुपवर व्हायरल केलेले आहे. कामगिरीवर हजर झालेल्या चालक वाहकांना लाखों रुपयांच्या वसुलीचे खुलासा पत्र दिले जात आहे. अशी खोटी माहिती पसरून कर्मचा-यांमध्ये संभ्रम निर्माण करुन भितीचे वातावरण तयार केले जात आहे. या सर्व घटनेमागे कर्मचा-यांनी घाबरून जाऊन आत्महत्या करावी, असे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर कामगिरीवर असणा-या इतर कर्मचा-यांना खोटे व बनावट कागदपत्रे तयार करुन भिती दाखवण्याचे प्रयत्न केला जात आहे. उच्च न्यायालयाने एसटी महामंडाळाच्या सर्व कर्मचा-यांची मनस्थिती खराब असल्याने त्यांचे वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच जे कर्मचारी कामगिरीवर जातील त्यांना आडवण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.