भाजप नेते नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे नितेश यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नितेश राणे हे जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करणार आहेत.
सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले
नितेश राणे यांना सत्र न्यायालय जामीन काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना आज सिंधुदुर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान या दोन दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी नितेश राणे यांची कसून चौकशी केली. तपासाचा भाग म्हणून पोलीस त्यांना गोव्यातही घेऊन गेले होते. तसेच राकेश परब आणि नितेश राणे यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली. यात पोलिसांच्या हाती आणखी काही महत्वाचे धागेदोरे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा बंडातात्या कराडकरांची पोलिसांकडून चौकशी! आता पुढे काय?)
गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला का तपासायचे
नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात आर्थिक व्यवहार झाला का, याचा तपास करायचा आहे. नितेश यांना पुण्याला न्यायचे असून अजून काही गोष्टींचा तपास करायचा आहे, त्यामुळे नितेश यांची पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी केली. तर नितेश राणे यांना आधीच दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community