पुण्यात बंडातात्यांविरोधात खटला दाखल! आता पुढे काय?

113

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय महिलांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे. याबाबत पुढील सुनावणीची तारीख उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे.

राज्यातील नेते आणि त्यांची मुले, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पितात, असे वक्तव्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सातारा येथे केले होते. मात्र, दुपारी इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले, ‘ज्यांच्याबद्दल मी वक्तव्य केले आहे, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागायला तयार आहे,’ असे सांगितले. पुढे बोलताना कराडकर म्हणाले, ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल, तर मी माफी मागतो. त्यात कमीपणा कसला’, असे कराडकर म्हणाले.

(हेही वाचा -कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची होतेय फसवणूक!)

राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या सुपर मार्केटमधून वाईन विक्री करण्याच्या निर्णयाच्या विरोधात परवानगी नसतानाही मोर्चा काढला. त्यानंतर बंडातात्या यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहे. पोलीस शुक्रवारी सकाळी बंडातात्या कराडकर यांच्या घरावर पोहोचले. त्यांची चौकशी सुरु केली आहे.

माझा कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. अनवधानाने बोललो आहे. ज्यांच्या विषयी मी बोललो, त्यांच्याविषयी माझा आकस नाही. सरकारने वाइनबाबत जी भूमिका घेतली ती चुकीची आहे, यावर आपण ठाम आहे.
– कीर्तनकार बंडातात्या कराडकर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.