‘पुष्पाराज’ला पोलिसांनी झुकवलंच…वाचा पूर्ण कहाणी

पोलिसांनी घेतली एंट्री आणि...

115

पुष्पा… पुष्पाराज… झुकेगा नही मैं… तेलुगू ब्लॉकबस्टर सिनेमा पुष्पा सिनेमातील हा डायलॉग आज प्रत्येकाच्याच ओठी आहे. या सिनेमातील पुष्पाराजची चाल त्याच्या डोक्यावरचे कुरळे बाल, त्याचं उठणं, बसणं या सगळ्याची नक्कल सध्या प्रत्येक जण करत आहे. पुष्पाच्या या गेटअपची नक्कल करण्यापर्यंत ठीक होतं, पण एका पठ्ठ्याने तर चक्क त्याच्या चंदनचोरीची स्टाईल सुद्धा कॉपी केली ना. मग काय पोलिसांनी त्याला झुकवलं ना राव… नुसतं झुकवलंच नाही तर पकडलं सुद्धा.

अशी केली पुष्पा स्टाईल चोरी 

पुष्पा स्टाईलने लाल चंदनाची तस्करी करणा-या या आरोपीचे नाव यासीन इनायथुल्ला असून, तो एक ट्रक ड्रायव्हर आहे. पुष्पा सिनेमा पाहून यासीन इतका प्रेरित झाला की त्याने पुष्पाप्रमाणेच चंदनाची तस्करी करायला सुरुवात केली. ट्रकमध्ये जीवनावश्यक वस्तू असल्याचे सांगत त्याने त्यात रक्तचंदन भरले होते. त्यावर पुष्पाप्रमाणेच फळे आणि भाजीपाला रचून ठेवला होता.

पोलिसांनी घेतली एंट्री आणि…

ही शक्कल लढवत त्याने आंध्र-प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमा पार केल्या. मात्र महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला सांगली जिल्ह्यातील मिरज नगर येथे पोलिसांनी पुष्पामधील भंवर सिंह शेखावत प्रमाणे एंट्री घेत अटक केली. त्यामुळे पुष्पा सिनेमाची जरी सध्या हवा असली तरी या आरोपीला मात्र तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.