महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या समित्या गठित: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

131

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकी भाजपचा झेंडा महापालिकेवर फडवकण्यासाठी जोरदार रणनिती आखली जात असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने समित्या स्थापन करत करत प्रत्येक नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये निवडणूकक संचालन समितीसह २५ समित्या स्थापन केल्या आहे. यामधील निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष हे भाजप नेते व आमदार ऍड आशिष शेलार तर जाहिरनामा समितीच्या अध्यक्षा खासदार पूनम महाजन आणि आरोप पत्र समितीचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत चर्चा करून या समित्या गठित करण्यात आल्या असल्याची माहिती मुंबईचे अध्यक्ष ऍड मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. निवडणूक संचालन समितीमध्ये खासदार गोपळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक आणि डॉ. किरीट सोमय्या हे विशेष निमंत्रत असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – पीएनजीच्या स्मशानभूमीकडे लोकांची पाठ, पर्यावरणपूरक लाकडी चिता उभारणार!)

निवडणूक संचालन समिती

अध्यक्ष : आमदार ऍड आशिष शेलार

सदस्य : आमदार कालिदास कोळंबकर, माजी आमदार प्रकाश मेहता, आमदार राहुल नार्वेकर, आमदार नितेश राणे

जाहिरनामा समिती

अध्यक्ष : खासदार पूनम महाजन

सदस्य : आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार राजहंस सिंह, आर.यु. सिंह, महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे

प्रशासन समन्वय : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर

प्रसार माध्यम व समाज माध्यम समिती:

अध्यक्ष : आमदार अतुल भातखळकर

सदस्य : आमदार राम कदम, अमरजीत मिश्रा, ऍड विवेकानंद गुप्ता

झोपडपट्टी संपर्क सामिती :

खासदार गोपाळ शेट्टी, आर.डी. यादव, तृप्ती सावंत

संसाधन : खासदार मनोज कोटक

आरोपपत्र समिती :

अध्यक्ष: आमदार अमित साटम

सदस्य : भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा

बाह्य प्रसिध्दी समिती : आमदार पराग अळवणी

प्रसिध्दी सामुग्री व्यवस्थापन समिती :

आमदार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शाह

बुथ संपर्क : संजय उपाध्याय

निवडणूक आयोग संपर्क :

प्रकाश महेता आणि कृपाशंकर सिंह

ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क : आमदार भाई गिरकर

वॉर रुम : प्रतिक कर्पे

ओबीसी संपर्क समिती : आमदार मनिषा चौधरी

उत्तर भारतीय संपर्क समिती :

जयप्रकाश ठाकूर, आर.यू.सिंह, अमरजित सिंह, जयप्रकाश सिंह, ज्ञानमूर्ती शर्मा

व्यापारी व छोटे व्यावसायिक संपर्क समिती : राज पुरोहित

दक्षिण भारतीय संपर्क समिती : आमदार कॅप्टन सेल्वन्

श्रमिक संपर्क (असंघटीत) : हाजी अराफत शेख

विशेष संपर्क समिती :

आमदार विद्या ठाकूर आणि आचार्य पवन त्रिपाठी

अनुसूचित जाती मोर्चा संपर्क समिती : शरद कांबळे

अल्पसंख्यांक संपर्क समिती : वसीम खान

नव मतदार संपर्क समिती :

तेजिंदर सिंग तिवाना, पल्लवी सप्रे, आरती पुगांवकर

महिला संपर्क समिती :

शलाका साळवी आणि शीतल गंभीर

प्रवासी कार्यकर्ता समिती : संजय पांडे

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.