राज्यात कोरोनाची लाट नियंत्रणात असली तरीही सद्यस्थितीत तिचा अवाका ग्रामीण भागांत दिसून येत आहे. तिसरी लाट लवकरच पूर्णपणे नाहीशी होण्याची शक्यता असली तरीही पुढच्या मार्च महिन्यात सुटकेचा निःश्वास टाकता येणार नाही. अशी स्पष्टोक्ती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी केले.
रुग्णांना वाचवणे वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान
कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉन विषाणूनेच आल्याचे सिद्ध झाले असले तरीही डेल्टा विषाणू पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. शिवाय तिस-या लाटेतही गंभीर आजार असलेल्या रुग्णांना वाचवणे वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हानच ठरले. ज्यावेळी मृ्त्यूदर शून्यावर येईल, रुग्णाला कोरोनावरील उपचारांसाठी जाण्याची फारशी शक्यता राहणार नाही, त्या दिवशी ख-या अर्थाने परिस्थिती आटोक्यात येईल, अशी स्पष्टोक्ती डॉ जोशी यांनी दिली.
(हेही वाचा – महापालिका निवडणूकीसाठी भाजपच्या समित्या गठित: ‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी)
…तर कोरोना झाल्यास रुग्ण दगावण्याची भीती नसेल
तिस-या लाटेत पहिल्यांदाच हिवाळ्यात कोविडच्या नव्या लाटेचे आगमन दिसून आले. त्यामुळे गंभीर आजार असलेल्या रुग्णांना येत्या काळातही सांभाळायचे आहे. त्यांनी आपल्या उपचारांत कोणतीही कमतरता ठेवू नये, जेणेकरुन कोणत्याही गंभीर परिस्थितीत कोरोनाची लागण झाल्यास रुग्ण दगावण्याची भीती राहणार नाही. ओमायक्रॉनमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली तरीही लसीकरणाची मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आव्हान अद्यापही बाकी आहे, हवेतून संसर्ग होण्यासाठी लोकांनी प्रतिबंधात्मक उपयायोजना आखावी, असे आवाहनही डॉ जोशी यांंनी केले.
Join Our WhatsApp Community