आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? तर तुमच्यासाठी ही आहे आनंदाची बातमी

आंगणेवाडी जत्रा आणि होळी सणासाठी मुंबई ते सावंतवाडीदरम्यान १० विशेष गाड्या

149

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस / दादर – सावंतवाडी रोडदरम्यान आंगणेवाडी जत्रा आणि होळी दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी १० विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत

अ) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष (२)

  1. ट्रेन क्रमांक 01161 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस दि. २३.२.२०२२ रोजी २३.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01162 विशेष सावंतवाडी रोडवरून दि. २४.२.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
  • संरचना : १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि ५ द्वितीय आसन श्रेणी.

(हेही वाचा –रविवारी बाहेर जाताय? ‘या’ हार्बर मार्गावर असणार मेगा ब्लॉक)

ब) दादर-सावंतवाडी रोड विशेष (८)

  1. गाडी क्रमांक 01163 विशेष दादर दि. १६.३.२०२२ ते १९.३.२०२२ पर्यंत दररोज १२.१० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोडला त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01164 विशेष गाडी दि. १७.३.२०२२ ते २०.३.२०२२ पर्यंत दररोज २३.५० वाजता सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दादरला दुसऱ्या दिवशी ११.१० वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ..
  • संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान आणि ७ द्वितीय आसन श्रेणी.
  • आरक्षण : 01161/01162 आणि 01163/01164 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ५.२.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.