पंजाब, चंदीगड, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली एनसीआर परिसरात आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत. भूंकपाचे झटके जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले. मात्र, या दरम्यान घर, जमीन हलत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी सकाळी 9.45 वाजता 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
(हेही वाचा – हिंदुस्थानी भाऊचे सर्व सोशल अकाऊंट होणार बंद! काय आहे सत्य )
An earthquake with a magnitude of 5.7 on the Richter Scale hit Afghanistan-Tajikistan Border Region at 9:45 am today: National Center for Seismology pic.twitter.com/74f7Qrj10T
— ANI (@ANI) February 5, 2022
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये सकाळी 9.45 वाजता 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने हे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजीने दिलीय.
Earthquake of Magnitude:5.7, Occurred on 05-02-2022, 09:45:59 IST, Lat: 36.340 & Long: 71.05, Depth: 181 Km ,Location: Afghanistan-Tajikistan Border Region, for more information download the BhooKamp App https://t.co/5E23iK2nl2 pic.twitter.com/qQ0w5WSPJr
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 5, 2022
यासंदर्भातील माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलपासून 259 किलोमीटर उत्तर-पूर्व, ताजिकिस्तानमधील दशानबेपासून 317 किलोमीटर दक्षिणपूर्व आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून 346 किलोमीटर उत्तरेकडे होता. अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमारेषेजवळ या भूकंपाचं केंद्र असल्याची देखील माहिती मिळत आहे.भूकंपामुळे थेट पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये धक्के जाणवले. याशिवाय चंदीगड आणि दिल्ली एनसीआर परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community