महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – १ यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२१-२२ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले आहे. त्यासंबंधी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण आहे. सदर परीक्षेचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे -१ चे आयुक्त एच्. आय्. आतार यांनी प्रसिद्ध केले आहे.
( हेही वाचा : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? तर तुमच्यासाठी ही आहे आनंदाची बातमी )
शिष्यवृत्ती योजना परीक्षा
इयत्ता आठवीत असलेल्या विध्यार्थ्यांना या परीक्षेचा अर्ज भरता येईल. पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पन्नास हजारच्या आत असणे गरजेचे आहे. परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थांना इयत्ता बारावी पर्यंत प्रत्येक महिन्याला रुपये एक हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. म्हणजे इयत्ता बारावी पर्यंत रुपये अठ्ठेचाळीस हजार मिळणार आहेत. प्रत्येक पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेत आहे त्या शाळेत संपर्क करावा आणि आपल्या पाल्यांना परीक्षेला बसवावे, असे आवाहन एच्. आय्. आतार यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community