दिलासा कायम! सलग दुस-या दिवशी ओमायक्रॉन रूग्णाची नोंद नाही

116

फेब्रुवारी महिना जसजसा पुढे सरकतो आहे तसतशी रुग्ण नोंदीतही सकारात्मक बदल दिसत आहेत. सलग दुस-या दिवशी ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. याउलट राज्यभरातील सक्रीय रुग्णांचा भार शुक्रवारी अजून कमी झाला. शुक्रवारी कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांच्याही आत सरकली. शुक्रवारी राज्यभरात १ लाख ४४ हजार ११ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु होते. गुरुवारी कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १५१ वर होती. वीकेण्डला सक्रीय रुग्णांच्या संख्येत ब-याच प्रमाणात घट होईल, असा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

० शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद – १३ हजार ८४९
० शुक्रवारी कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७ हजार ८९१
० शुक्रवारी राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – ८९
० राज्यातील मृत्यूदराचा टक्का – १.८३ टक्के
० राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९६.२६ टक्के

(हेही वाचा – मार्चपर्यंत सतर्कता बाळगा! पण का? वाचा सविस्तर)

ओमायक्रॉनविषयी…

० राज्यात आतापर्यंत दिसून आलेल्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या – ३ हजार ३३४
० राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनवर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या – २ हजार०१३
० राज्यात ओमायक्रॉनबाधित सक्रीय रुग्णांची संख्या – १ हजार ३२१

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.