“आशीर्वाद सेल्फी महोत्सव २०२२” कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी अनोखी संकल्पना

144

ज्या भ्रमणध्वनीमुळे (मोबाईल) घरात असूनदेखील माणसं एकत्र येत नव्हती, त्याच भ्रमणध्वनीचा वापर करून कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी आशीर्वाद चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले यांच्या सुपीक डोक्यातून “आशीर्वाद सेल्फी महोत्सव २०२२” संकल्पना बाहेर आली. आपल्या कुटुंबीयांसोबत, आई-वडील, जोडीदार, मित्र किंवा मैत्रिणीसोबत सेल्फी काढून सहभाग घेण्यासाठी कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते बांद्रा ह्या क्षेत्रात रहाणार्‍या नागरिकांना आमंत्रित करण्यात आले. एक खास गट देशसेवा करणार्‍या आजी-माजी सैनिकांसाठी देखील निर्माण केला. बघता बघता महोत्सवासाठी नागरिकांनी चांगलाच सहभाग नोंदवला.

आशीर्वाद चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे आयोजक उमेश येवले हे आपल्या मनोगतात म्हणाले, “आशीर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ च्या माध्यमातून आम्ही एक नवीन संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. कोणतीही नवीन संकल्पना स्वीकारायला थोडा वेळ लागतो, पण एकदा ती स्वीकारली गेली की त्याचं लोण पसरायला वेळ लागत नाही. त्या अर्थाने आपण ट्रेंड सेटर आहोत आणि मला आनंद आहे की स्पर्धा प्रमुख गुरुदत्त वाकदेकर, परीक्षक रमेश वाणी आणि माध्यम प्रायोजक आदर्श स्वराज हे या अनोख्या संकल्पनेचे प्रारंभ कर्ते ठरले आहेत.”

परीक्षक रमेश वाणी यांनी शुभेच्छा देताना सांगितले, “माझ्या आजवरच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे मी परीक्षण केलं आहे. स्पर्धा म्हटली की हार जीत आलीच. म्हणूनच ज्यांचे क्रमांक आले नाहीत त्यांनी नाराज न होता आपल्याकडून अजून चांगलं काय करता आलं असतं याचा नक्कीच विचार करा. या अनोख्या संकल्पनेचे आपण भाग आहात हादेखील आपला एकप्रकारे विजय आहे, असं मला वाटतं.”

या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक असलेल्या आदर्श स्वराज्यचे उदय पवार यांनीही विजेत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. सोबतच आशिर्वादच्या ह्या अनोख्या महोत्सवाचा एक महत्वाचा घटक होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. तसेच यापुढेही असे नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करा आम्ही आपल्या सोबत आहोत हा शब्द देऊन आयोजकांचे मनोबल वृद्धिंगत केले.

(हेही वाचा : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा )

स्पर्धा प्रमुख गुरुदत्त वाकदेकर यांनी, आशीर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट आणि आशीर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ ह्या महोत्सवात मला स्पर्धा प्रमुख ही जबाबदारी देऊन समाजात चांगलं काम करणार्‍या संस्थेने आणि अध्यक्ष उमेश येवले यांनी जो विश्वास दाखवला त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आम्ही ह्यापूर्वी कोणताच कार्यक्रम एकत्र केलेला नाही, असं असताना देखील ही संधी आणि विश्वास दाखवल्याबद्दल अध्यक्षांचे मनापासून आभार मानले. स्पर्धेचं चोख आणि निष्पक्ष परीक्षण केल्याबद्दल स्पर्धेचे परीक्षक रमेश वाणी, माध्यम प्रायोजक आदर्श स्वराज्य आणि संपादक उदय अशोक पवार यांचे आणि त्यांच्या टीमचेही मनःपूर्वक आभार मानले.

आशीर्वाद सेल्फी महोत्सव २०२२ अंतिम निकाल

गट – मी सैनिक
प्रथम क्रमांक – भरत महादेव सुगदरे
द्वितीय क्रमांक – नारायण केशव जाधव
तृतीय क्रमांक – शशिकांत बाबा मोरे

गट – मी आणि आई किंवा बाबा
प्रथम क्रमांक – राजन वसंत देसाई आणि आई
द्वितीय क्रमांक – सुनिता गोरे आणि आई
तृतीय क्रमांक – तुषार पाटेकर आणि आईवडिल

गट – मी आणि माझे कुटुंब
प्रथम क्रमांक – नंदा मस्के आणि कुटुंब
द्वितीय क्रमांक – उल्हास हरमळकर आणि कुटुंब
तृतीय क्रमांक – अनिल अंबाजी जाधव आणि कुटुंब

गट – मी आणि माझा मित्र किंवा मैत्रिण
प्रथम क्रमांक – समीर श्रीनाथ पवार आणि मित्र
द्वितीय क्रमांक – प्रतिभा सावंत आणि मैत्रिणी
तृतीय क्रमांक – माधव गजानन भालेराव आणि मित्र

गट – पती-पत्नी (जोडीदार)
प्रथम क्रमांक – रुपेश लिंगायत आणि पत्नी
द्वितीय क्रमांक – मयूर अभिजीत कारखेले आणि पत्नी
तृतीय क्रमांक – नवनाथ लक्ष्मण गाढवे आणि पत्नी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.