…जेव्हा सुप्रिया सुळे म्हणतात ‘खाल्ल्या मिठाला जागू नका’

142

सध्याचं राजकारण इतकं स्वार्थी झाल्याचं दिसतंय. ज्या राजकीय पक्षाने आपली राजकीय कारकिर्द उभी केली त्या पक्षानं संधी दिली नाही की, त्या पक्षाला सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या ही वाढतांना दिसतेय. अशा राजकीय पक्षांचे नेते मंडळी एकप्रकारे त्यांचं प्रतिनिधित्व करतच असतं. त्याविषयी संसदेत प्रबोधनात्मक बोलण्याच्या नादात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भलत्याच स्वरूपात मराठी म्हण सांगून ती परिस्थिती पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचेच हासू झाल्याचे समोर आले.

संसदेत नेमकं काय घडलं

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना संसदेत बोलताना खाल्ल्या मीठाला जागावे या मराठी म्हणीचा वापर करायचा होता. मात्र नेमकं झालं उलटंच… बोलताना त्यांच्या तोंडून ही म्हण सपशेल उलटी निघाली आणि एकच गोंधळ उडाल्याचे समोर आले. खाल्ल्या मीठाला जागावे या ऐवजी त्या म्हणाल्या, खाल्ल्या मीठाला जागू नका.. यामुळे सगळ्यांचा भुवया उंचावल्या.

सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करताना सुप्रिया सुळेंनी मराठीतल्या एका म्हणीचा वापर केला. ती म्हण म्हणजे, खाल्या मिठाला जागा! मात्र, ही म्हण म्हणताना सुप्रिया सुळे यांचा गोंधळ उडालेला दिसला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, खाल्या मिठाला जागू नका! असं त्या चुकून म्हणाल्या. आणि त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरुन चांगलीच टीका होत असल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा – पवई तलाव संवर्धनासाठी महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय! )

यावेळी वापरली सुप्रिया सुळेंनी मराठी म्हण…

केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये व डिझेलवर 10 रुपये सूट दिली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एक रुपयाही कमी केला नाही. उलट दारूचा उत्पादन शुल्क कमी केला. दारु स्वस्त व पेट्रोल महाग अशी स्थिती निर्माण केली. दारू प्या मात्र वाहन चालवू नका असा संदेशच जणू महाविकास आघाडीला द्यायचा आहे. ते वाईनला दारू म्हणत नाहीत मात्र वाईनच्या बाटली मागे अल्कहोलचे प्रमाण दिले आहे. ते कशासाठी? त्यांना वाटत महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी नशेत रहावे. त्यांना जनतेचे पाप दिसू नये. त्यांचा सत्तेचा नशा जनता लवकर उतरवेल, असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला.

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, खाल्लेल्या मीठाची जाण ठेवावी, ही माझ्या आईची शिकवण आहे. ती आमची संस्कृती आहे. 10 वर्षे तुम्ही ज्यांच्या बरोबर मंत्री राहिले. त्यांचे गांधी कुटुंबाबरोबर संबंध होते. संसदेत बोलताना आपली बाजू मांडावी मात्र आपला इतिहास विसरू नये. केंद्राच्या वयोश्री योजनेचा डाटा तुम्ही तपासा. मागील 2 ते 3 वर्षांत सलग पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कोण आहेत हे पहावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.