दादर… आता दादर म्हटल्यावर आपल्या डोक्यात दादरचं फुल मार्केट, भाजी मार्केट येतं. सणासुदीला सजावटीसाठी लागणा-या शोभेच्या वस्तू दादरमध्ये मिळतात. इतकंच नाही तर नवरा बायको सोडून लग्नात लागणा-या सगळ्या वस्तू आपल्याला दादरमध्ये सहज मिळतात. तर याच दादरच्या प्रसिद्ध अशा रानडे रोडवर मी आता आहे आणि इथे खूप छान कलाकुसरीच्या वस्तू आपल्याला दिसतायंत आणि या सुंदर वस्तू घडवणारे हे कलाकार आता आपल्या सोबत आहेत. तर आपण आता थेट त्यांच्याशीच गप्पा मारुया.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा..
Join Our WhatsApp Community