जिओ ग्राहक वैतागले…अन् ट्वीटरवर ट्रेंड झाले #JioDown

152

देशातील आघाडीची मोबाइल नेटवर्क सेवा देणारी कंपनी रिलायन्स जिओचे नेटवर्क मुंबई टेलिकॉम क्षेत्रात कमी झाले असल्याचे समोर आले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागात जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रिलायन्स जिओ नंबरवरून येणारे कॉल कनेक्ट होत नसल्याची तक्रार अनेक जिओ ग्राहकांनी केली आहे. बर्‍याच जिओ युजर्स ट्विटरवर नोंदवले आहे की ते यावेळी त्यांच्या जिओ नंबरवरून कोणतेही कॉल करू शकत नाहीत. दरम्यान, नॉन-जिओ नंबर असलेल्या लोकांना कॉल कनेक्ट करताना समस्या येत आहेत. जिओने मुंबईतील नेटवर्क बंद केल्याचे समजते.

हा बिघाड कशामुळे झाला (Jio Network Outage) हे अद्याप कळू शकलेले नाही. या संदर्भात रिलायन्स जिओकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आउटेजचे निराकरण होईपर्यंत, Jio युजर्स संवादासाठी पर्यायी क्रमांक वापरू शकतात. किंवा तुम्ही जवळपासच्या WiFi नेटवर्कशी कनेक्ट करू शकता आणि WhatsApp कॉल सारख्या इंटरनेट कॉलिंग सेवा वापरू शकता.

युजर्सनी ट्विटरवर केली तक्रार 

मुंबईतील अनेक रिलायन्स जिओ युजर्संना कॉल येत असल्याची माहिती दिली आहे. ट्विटरवरील काही युजर्सनी असे सांगितले की, ते त्यांची इंटरनेट सेवा वापरत असताना अडचणी येत आहेत आणि जेव्हा ते कॉल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना “Not registered on network” असा  संदेश मिळत आहे. याशिवाय एका युजरने पोस्टवर कमेंट करताना सांगितले की, तो गेल्या तीन दिवसांपासून या समस्येचा सामना करत आहे. या समस्येमुळे रिलायन्स जिओचे ग्राहक वैतागले असून ट्वीटरवर #JioDown हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.