राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आता कमालीची घट होतांना दिसतेय. शनिवारी केवळ ११ हजार ३९४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. तिस-या लाटेत सध्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी असली तरीही लोकांनी कोरोनाची गंभीर लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जनुकीय चाचणींबाबत प्रयोगशाळांचा अहवाल प्रलंबित राहिल्याने ओमायक्रॉन विषाणूची नवी नोंद झालेली नसल्याचेही डॉ व्यास म्हणाले. रुग्णांच्या नव्या नोंदणीपेक्षाही वेळेवर उपचार मिळाल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यात आरोग्य विभाग यशस्वी झाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले. राज्यात आता ९६.४० टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या नोंदवले जात आहे.
(हेही वाचा – …जेव्हा सुप्रिया सुळे म्हणतात ‘खाल्ल्या मिठाला जागू नका’…)
दरम्यान डिस्चार्ज संख्या कमी होत असल्याने आता घरी विलगीकरणातील लोकांचीही संख्येत घट होत आहे. राज्यात आता केवळ ७ लाख ९५ हजार ४२२ लोकांना घरी विलगीकरणात ठेवले आहे.
Join Our WhatsApp Community