मॅकडॉनल्ड, केएफसीने बंद केली फ्रेंच फ्राईसची विक्री… काय आहे कारण?

यामुळे फ्रेंच फ्राईसच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

125

मॅकडॉनल्डस्, केएफसी म्हणजे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खवय्यांची हक्काची ठिकाणं. महाराष्ट्राचं आवडतं खाद्य बटाटा वडा हा तर जगभरातील खादाड कंपनीचा आवडता पदार्थ. पण त्यासोबतच केएफसी आणि मॅकनॉल्डमधील बर्गर आणि इतर पदार्थांसह इथे मिळणारे फ्रेंच फ्राईस हा सानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचीच भूक भागवतो.

पण काही देशांतल्या मॅकडॉनल्डस् आणि केफसी आउटलेटनी फ्रेंच फ्राईस आणि इतर बटाट्याच्या पदार्थांची विक्री बंद केली आहे. बटाट्यांच्या मर्यादित पुरवठ्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

लार्ज फ्रेंच फ्राईसची विक्री झाली बंद

मॅकडॉनल्ड जपानने पुरवठ्याच्या अडचणीमुळे जानेवारीपासून फ्रेंच फ्राईसची विक्री कमी केली आहे. इंडोनेशिया आणि मलेशियातील मॅकडॉनल्डने लार्ज फ्रेंच फ्राईस बंद करुन मिडियम आणि स्मॉल फ्रेंच फ्राईसची विक्री सुरू ठेवली आहे.

काय आहे कारण?

आफ्रिका खंडातील मॅकडॉनल्ड आणि केएफसीच्या आउटलेटमध्ये फ्रेंच फ्राईसची विक्री बंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या खराब हवामानामुळे बटाटा उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळेच बटाट्यांचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने फ्रेंच फ्राईसच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही परिस्थिती भारतात उद्भवू नये अशी आशा खवय्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.