सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला, तसेच भारतरत्न लता दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लता दीदींचे अंतिम दर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. लता दीदींवर शिवतीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, तशी तयारी सुरु करण्यात आली आहे.
शिवाजी पार्कात अंत्यसंस्काराची तयारी सुरु…
आपल्या जादूई आवाजाने अनेक पिढ्यांवर गारूड निर्माण करणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला अर्पण करणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. तब्बल 28 दिवसांपासून सुरू असलेला जीवनमरणाचा संघर्ष थांबला. संध्याकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी पार्कात काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मुंबईत शिवाजी पार्कवर येऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाजी पार्क येथे त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्या प्रमाणे शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तसेच अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव प्रभूकुंज येथे ठेवण्यात आले होते.
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत शिवाजी पार्कवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.#MumbaiPolice #ShivajiPark #LataMangeshkar #Lataji #RIPLataMangeshkar #Mumbai #LataMangeshkarDeath #LataMangeshkarFuneral pic.twitter.com/cwN7YY4Kwi
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 6, 2022