ए मेरे वतन के लोगो…हे गीत शेवटचे केव्हा गायले होते?

198

“ए मेरे वतन के लोगो” हे कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले देशभक्तीपर गीत आहे. हे गाणे 1962 च्या चिनी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात आले होते. २७ जानेवारी १९६३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले, तेव्हा हे गाणे प्रसिद्ध झाले. यानंतर इतक्या दशकानंतर आजही कोणत्याही राष्ट्रीय कार्यक्रमात हे गीत लावले जाते. परंतु हे गाणे लता दीदींनी शेवटचे कधी गायले होते तुम्हाला माहीत आहे का?

( हेही वाचा : नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाज़ ही पहचान है…देशभरातून शोक व्यक्त )

गाण्याला पूर्ण झाली होती ५० वर्षे

‘ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आंख में भर लो पानी’ या गाण्याला २०१४ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने लोढा फाऊंडेशनच्या वतीने महालक्ष्मी रेसकोर्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित होते. जवळपास १ लाख लोकांच्या साथीने लता दीदींनी हे गाणे गायले व ‘आज मी हे गाणे शेवटचे गात असून मी पुन्हा हे कोणतेही गीत सार्वजनिक व्यासपीठावरून गाणार नाहीट, असे त्यांनी जाहीर केले होते. या गाण्याच्या गीतकार, संगीतकारांसह लता दीदींचे यावेळी पंतप्रधानांनी कौतुक केले होते.

( हेही वाचा : स्वर्गीय सूर हरपला…गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली )

आधी दिला होता नकार…

कवी प्रदीप यांनी लता मंगेशकर यांना हे गाणे गाण्याचा प्रस्ताव दिला होता, पण वेळ नसल्यामुळे लता दीदींनी सुरुवातीला ते गाण्यास नकार दिला होता. नंतर कवी प्रदीप यांच्या आग्रहास्तव लता दीदींनी हे गाणे गाण्यास होकार दिला. कोणत्याही हिंदी चित्रपटाचा भाग नसतानाही हे गाणे प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आजही कायम आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.