लतादीदींचे निधन : दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर!

131

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात सरकारने काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

( हेही वाचा :ए मेरे वतन के लोगो…हे गीत शेवटचे केव्हा गायले होते? )

मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 राष्ट्रीय दुखवटा जाहीर

गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबईतील दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय दुखवट्याअंतर्गत ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.

(हेही वाचा लता दीदींनी तेव्हा दिली होती मृत्यूला मात, पण…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.