राजस्थान मधून अशाप्रकारे सुरू होती ड्रग्सची तस्करी वाचा…

102

ड्रग्सची तस्करी करण्यासाठी तस्करांकडून बुटांच्या जोडचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत उघडकीस आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटच्या पथकाने वसई या ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच कोटी १७ लाख रुपये किंमतीचा हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडे राजस्थानमधून आलेल्या बुटांच्या पार्सलमधून हा ड्रग्स आणण्यात आला होता, अशी माहिती पोलिसानी दिली आहे.

drungs smuggling

वसई तालुक्यातील पेल्हार गावात भाड्याच्या घरात राहत 

अमीन मोहम्मद अख्तर (४६) आणि छोटा मोहम्मद नासिर (४०) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मूळचे उत्तराखंड राज्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. वर्षभरापासून हे दोघे मुंबईपासून जवळ असणाऱ्या वसई तालुक्यातील पेल्हार गाव या ठिकाणी भाडे तत्वावर घर घेऊन राहत होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या पथकाने शुक्रवारी वसई येथील पेल्हार गाव या ठिकाणी एका घरात छापा टाकून अमिन आणि छोटा मोहम्मद या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ किलो ७६० ग्राम हेरॉईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ५ कोटी १७ लाख रुपये किंमत आहे.

(हेही वाचा अखेरचा हा तुला दंडवत…! लता दीदी अनंतात विलीन)

न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

या दोघांकडे केलेल्या चौकशीत मागील वर्षभरापासून हे या ड्रग्सच्या व्यवसायात असून त्यांना हा ड्रग्स राजस्थानमधून पुरवला जातो. राजस्थान येथून नवीन बुटाच्या सोलमधून या ड्रग्सची तस्करी करून हे बूट या दोघापर्यंत पोहचवले जात होते. त्यानंतर हे दोघे या ड्रग्सची विक्री मुंबई, ठाणे परिसरातील किरकोळ ड्रग्स विक्रेत्यांना पुरवत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. याप्रकरणी या दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.