रविवारी राज्यात कोरोनाच्या दैनंदिन नोंदीची संख्या चक्क दहा हजारांच्या खाली गेली. चोवीस तासांच केवळ ९ हजार ६६६ कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर तब्बल २५ हजार १७५ रुग्णांना एका दिवसांत डिस्चार्ज दिला गेला. परिणामी सध्या राज्यात केवळ १ लाख १८ हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारपर्यंत ही संख्या एक लाखांच्याही आत सरकेल, अशी आशा आरोग्यविभागाने व्यक्त केली.
जनुकीय चाचण्यांच्या तपासण्यांबाबत प्रश्नचिन्ह
रविवारी सलग चौथ्या दिवशी ओमायक्रॉनचा नवा रुग्ण न आढळल्याने राज्यातील जनुकीय चाचण्यांच्या तपासण्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. चार दिवसांपासून १५९ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. मात्र त्याबाबत आरोग्य विभागाकडून कोणताही खुलासा झालेला नाही. राज्यात किमान सहा ते सात प्रयोगशाळांच्या मदतीने जनुकीय चाचणी सुरु आहेत. यात केंद्र तसेच नजीकच्या गुजरात राज्यातील प्रयोगशाळांचीही मदत आरोग्य विभागाने घेतली आहे. मात्र तिसरी लाट आटोक्यात येत असताना प्रयोगशाळांकडून प्रलंबित जनुकीय अहवालाबाबत आरोग्य विभागाच्या अधिका-यांकडून घुमजाव सुरु आहे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९६.६० टक्के
- राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७५ लाख ३८ हजार ६११
(हेही वाचा शाहरूख खान लता ताईंच्या पार्थिव देहावर थुंकला? सोशल मीडियावर झाला ट्रोल)
Join Our WhatsApp Community