“सोमय्यांचे हात-पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश”

118

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्या राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापलं आहे. सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपकडून आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकरावर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोमय्या यांनी हात पाय तोडण्याचे आदेश देण्यात आले होते, असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी असाही आरोप ठाकरे सरकारवर केला की, ”पुण्यात माझ्यावर झालेला हल्ला हा मुख्यमंत्र्याच्या सुचनेनंतर करण्यात आला आहे.”

असा केला सोमय्यांनी दावा

शारिरीक इजा झालेली नाही, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना असं कट रचत आहे. सीआयएसएफच्या अहवालत पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे, असा मार देण्याचा कट होता, असा प्रकारचा धक्कादायक दावा किरीट सोमय्यांना त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केला आहे.

सोमय्यांचा गंभीर आरोप

“संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचे सगळे पुरावे सापडल्याने गेल्या १५ दिवसांत उद्धव ठाकरे प्रचंड अस्वस्थ आहेत. अनिल परब यांच्यावर तर कारवाईच सुरु झाली असून संजय राऊत. अनिल परब, ठाकरे परिवार आणि रश्मी ठाकरेंच्या भावाचा सहभाग सापडला आहे. त्यांनी ठरवून हे केलं”, असे किरीट सोमय्या म्हणाले. इतकेच नाही तर किरीट सोमय्यांचे हात-पाय तोडा, दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत, असा आदेश होता, हीच सूचना पोलीस आयुक्त आणि शहराध्यक्षांनाही दिली होती”, असा गंभीर आरोप त्यांनी शिवसेनेवर केला आहे.

(हेही वाचा – कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबवर आग्रहीच! वाद पेटला, ड्रेस कोडची ऐशी तैशी )

दरम्यान, किरीट सोमय्यांनी ट्विट केलं. आपली हत्या करण्याचा हेतू होता असा आरोप त्यांनी केला असून त्यांनी यासोबत एक व्हिडिओदेखील जोडला आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात मोठा दगड देखील दिसत आहे. ते पुढे असेही म्हणाले की, मी पालिका आणि पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांची भेट घेणार असून कारवाईची मागणी करणार आहे. स्थानिक पोलीस अधिकारी, पालिकेचा सुरक्षा प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि यावर मुख्यमंत्री कार्यलयाकडून उत्तर देण्यात आलं पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.