लोढांचा हस्तक्षेप कमी, शेलारांची वाढवली ताकद

84

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबई अध्यक्षांच्या जबाबदारीचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली असल्याने मुंबई अध्यक्ष असलेल्या आमदार मंगलप्रभात लोढा यांचा मवाळ स्वभाव हा या भाजपच्या आक्रमतेच्या आड येता होता. त्यामुळेच मंगलप्रभात लोढाच हेच मुंबई अध्यक्षपदी राहावेत अशी शिवसेनेच्या नेत्यांची तीव्र इच्छा होती. परंतु त्यांची इच्छा पूर्ण करतानाच भाजपने त्यांच्या पदाची इतर जबाबदारी सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक शेलारांवर जबाबदारी सोपवली. त्यामुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष मवाळ भूमिकेचे असले तरी निवडणुकीची जबाबदारी आक्रमक स्वभावाच्या शेलार यांच्यावर सोपवत लोढांचा हस्तक्षेप कमी करत शेलारांची ताकद भाजपने वाढवल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : शिवसेनेसोबत जायचं की सरकारमधून बाहेर पडायचं? ‘हा’ पक्ष द्विधा मनस्थितीत! )

शेलारांवर जबाबदारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला शिवसेना पक्ष सरकारमध्ये असल्याने त्यांची बाजू अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी भाजपलाही आक्रमक बाणा अवलंबावा लागणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा हे मवाळ भूमिकेचे आहे. त्यांच्याकडे आक्रमक पणाचा अभाव आहे. एका बाजूला भाजपमधून सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन, मोर्चा काढून आक्रमक होत असताना मुंबई अध्यक्षांचा मवाळ स्वभाव हा आड येत होता. त्यातच लोढा यांचे आमदार, नगरसेवक व पक्षाचे प्रतिनिधी यांच्यासोबत जुळत नसल्याने तसेच्या त्यांच्यासोबत समन्वय नसल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची भीती वर्तवली जात होती. त्यामुळे भाजपला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, तर भाजपमधील मुंबई अध्यक्षांची मवाळ भूमिका यामुळे शिवसेनेनेतील नेत्यांना लोढाच निवडणुकीपर्यंत तरी या पदावर रहावेत अशाप्रकारची इच्छा होती. त्यामुळे अखेर मुंबई भाजपच्या वतीने पदांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक संचालन समितीसह २५ समित्यांची स्थापना करत प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आमदार मंगलप्रभात लोढा हे मुंबई अध्यक्ष असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीची मुख्य जबाबदारीही निवडणूक संचालन समितीवर असेल. त्यामुळे लोढा यांना पदावरुन खाली न उतरवता भाजपने या समितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांना बनवून लोढांच्या मागे आक्रमकतेची ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे यापुढे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळी जान आली असून आता शेलारांच्या नेतृत्वाखाली नव्या उर्मीने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीही या सर्वांनी केली आहे.

( हेही वाचा : भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी लोढा असणे शिवसेनेच्या पथ्यावर )

ही तर शिवसेनेची इच्छा…

मागील १७ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंदुस्थान पोस्टने मुंबईच्या अध्यक्षपदी लोढा असणे शिवसेनेच्या पथ्यावर अशाप्रकारचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर भाजपच्यावतीने सध्या मुंबईत मराठी कट्टा आणि चौपालसारखे कार्यक्रम राबवून मराठी आणि उत्तर भारतीय लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असला तरी त्यांच्या मुंबई अध्यक्षपदी असलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे तसेच त्यांचे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी जुळत नसल्याने, शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहे. म्हणूनच निवडणुकीपर्यंत भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी लोढाच राहावेत अशी इच्छा खुद्द शिवसेनेची असल्याचे त्यात म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.