अरुणाचल प्रदेश येथील कामेंग सेक्टरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. याभागात झालेल्या हिमस्खलनात जवळपास सात जवान अडकले आहेत अशी माहिती भारतीय लष्काराने दिली आहे. कामेंग येथे काही दिवसापासून सलग बर्फवृष्टी होत आहे. यामुळे हिमस्खलन होऊन त्याखाली गस्तीपथकातील किमान सात जवान अडकल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. लष्कराने बचावकार्य सुरू केले असून बचावकार्यात अनेक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. तसेच मदत करण्यासाठी विशेष पथके विमानातून पाठवण्यात आली आहेत.
( हेही वाचा : स्वातंत्र्य कवी गोविंद यांच्या कविता संग्रहाची पाचवी आवृत्ती लवकरच )
भारतीय सैन्याचे जवान रविवारी 6 फेब्रुवारी रोजी गस्तीवर असताना हिमस्खलनात बेपत्ता झाले आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथके विमानाने पाठवण्यात आली आहेत. उंच भागात हिमस्खलनात अडकलेल्या भारतीय लष्कराच्या सात जवानांना वाचवण्यासाठी लष्कराच्या अनेक हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात आला आहे. असेही भारतीय लष्काराने स्पष्ट केले.
सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम
मनाली-लेह महामार्गावर हिमस्खलन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर सुट्टीवर गेलेल्या पर्यटकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वृत्तानुसार, राज्यातील चार राष्ट्रीय महामार्गांसह 731 हून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे सर्वत्र गाड्या अडकल्या आहेत. यामुळे वीज आणि पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.
जोरदार बर्फवृष्टी होत आहे.हिवाळ्याच्या महिन्यांत उंचावरील भागात गस्त घालणे कठीण होते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये लष्कराने आपले जवान गमावले आहेत. मे 2020 मध्ये सिक्कीममध्ये हिमस्खलन झाले होते. यावेळी दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या हिमस्खलनात नौदलाचे 5 जवान मरण पावले होते.
Join Our WhatsApp Community