पोलिसांच्या ताब्यातून सुटताच ‘इन्स्टा क्वीन’नं असा केला कहर!

103

इंस्टाग्रामवरील ‘थेरगाव क्वीन’ या अकाऊंटमुळे चर्चेत आलेल्या साक्षी श्रीमल या तरुणीला काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. परंतु नंतर तिची जामिनावर सुटका देखील करण्यात आली होती. परंतु या सर्व प्रकरणात पुन्हा तिने कुठलाच धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. कारण या ‘थेरगाव क्वीन’ने आता तर पोलिसांनी तिला अटक केल्यानंतरचा व्हिडिओ टाकून जणू पिंपरी चिंचवड पोलिसांना आव्हान दिलं आहे.

पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिने केला कहर

थेरगाव क्वीन या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन अश्लील भाषेतील आणि धमक्या देणारे व्हिडिओ टाकल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर तिला अटक केली होती. मात्र पोलिसांच्या ताब्यातून सुटताच तिने कहर केल्याचे समोर आले आहे. आधी तिने तुरुंगातून सुटल्यानंतर जल्लोष केल्याचा व्हिडिओ टाकला होता. त्यानंतर आता पोलिसांनी अटक केल्यानंतर घेऊन जात असताना आत्ताचा व्हिडिओ रिल्स बनवून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

‘थेरगाव क्वीन’ नावाने साक्षी श्रीमल हिचे इंस्टाग्रामवर अकाऊंट असून, त्यावर तिच्या मित्र आणि मैत्रिणीसह अश्लील भाषेतील, धमकीचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरूणींना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी साक्षी हेमंत श्रीमल, कुणाल कांबळे आणि साक्षी राकेश कश्यप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांच्याकडून करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.