मोदी म्हणतात… देशभरात कोरोना पसरवण्यात ‘या’ पक्षाचा ‘हात’!

120

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, कोरोना महामारीच्या काळातही राजकारणाचा वापर केला गेला. कोरोनाच्या काळात काँग्रेसने मर्यादा ओलांडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश लॉकडाऊन नियमांचे पालन करत होता. यावेळी आरोग्य तज्ज्ञांनी देखील असे सांगितले होते की, जो जिथे आहे त्याने तिथेच राहा, स्थलांतर करू नका. परंतु कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थंलातर करायला लावले. परप्रांतियांना तिकिटं काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पाडले. मोफत तिकीट देऊन लोकांना मुंबईहून यूपी-बिहारला पाठवले. त्यामुळे देशभरात कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार आहे, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

पुढे मोदी असेही म्हणाले, कोरोना महामारीत काँग्रेसने अनेक समस्या निर्माण केल्या. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा कोरोना संकट मोठ्या प्रमाणात वाढलं. हे कशा पद्धतीचं राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण कधीपर्यंत चालणार आहे. मागील दोन वर्षांपासून देश कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.

(हेही वाचा – “भारतीय ‘रिलीजन’ स्वभावाने हिंदू आहेत”)

मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केल्यानंतर काही विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी मोदी म्हणाले, काँग्रेसचा पराभव झाल्यानंतरही त्यांचा अहंकार जात नाही. उत्तर प्रदेशसह बिहारला काँग्रेसमध्ये मतं मिळाली नाहीत त्यामुळे गोव्यात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आले नाही. मतदार आता काँग्रेसला नाकारत आहेत. २०१४ च्या मानसिकतेतून विरोधक बाहेर आलेले नाही तर काँग्रेस उपदेश देताना सत्तेतील ५० वर्ष विसरत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.