रत्नागिरी जिल्ह्यातील वेत्ये येथील राजापूरमध्ये ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १२६ अंडी सापडली आहेत. समुद्रकिनारी पहाटेच्या दरम्यान फेरफटका मारताना कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळली असून त्यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे योग्य पद्धतीने संवर्धन केले आहे. वेत्ये किनारपट्टीवर आढळलेले यावर्षीचे हे चौथे घरटे ठरले असून आजपर्यंत या ठिकाणी ३९४ अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करण्यात आले आहे.
ऑलिव्ह रिडले कासवाची सापडली अंडी
नेहमीप्रमाणे वेत्ये- तिवरे सागरी किनारपट्टीवर फेरफटका मारताना कासवमित्र जाधव यांना वाळूमध्ये कासवाच्या पायाचे ठसे उमटलेले दिसले. त्या ठशांच्या अनुषंगाने शोध घेतला असता त्यांना ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी काही अंतरावर सापडली. त्यामध्ये १२६ अंड्यांचा समावेश आहे.
(हेही वाचा- मोदी म्हणतात… देशभरात कोरोना पसरवण्यात ‘या’ पक्षाचा ‘हात’! )
अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन
जाधव यांनी तत्काळ राजापूर वन विभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्यावरील वन्यप्राणी वा जंगली श्वापदांपासून त्या अंड्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community