फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटताच आता जनुकीय चाचण्यांमधूनही ओमायक्रॉनची बाधा नाहीशी झाल्याचे सकातरात्मक चित्र आहे. ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येतही आता कमालीची घट नोंदवली जात आहे. राज्यात तर सोमवारी केवळ ६ हजार ४३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर तिप्पटीने रुग्ण बरे होऊन घरी परतले होते.
बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९६.७६ टक्के
सोमवारी १८ हजार ४२३ कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. दर दिवसाला रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता वाढत आहे. सोमवारी राज्यात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९६.७६ टक्के नोंदवले गेले. २४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपासून १५९ ओमायक्रॉनचाचणीकरता केलेल्या जनुकीय तपासणीचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी ३६ अहवालांत ओमायक्रॉनचा विषाणू आढळला नाही. आतापर्यंत १ हजार २९९ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आले.
(हेही वाचा – मोदी म्हणतात… देशभरात कोरोना पसरवण्यात ‘या’ पक्षाचा ‘हात’! )
केवळ १ लाख ६ हजार ५९ कोरोनाचे रुग्ण
दररोज १५ ते २५ हजारांच्या संख्येत कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. त्यामुळे सक्रीय रुग्णांत मोठ्या संख्येने घट नोंदवली जात आहे. सोमवारी केवळ १ लाख ६ हजार ५९ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु होते. मंगळवारपर्यंत ही संख्या एक लाखांच्याही खाली येईल, अशी आशा आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community