हुंडाई, केएफसी आता पिझ्झा हट…स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार सुरूच

138

सध्या पाकिस्तान हा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या सोशल अकाउंटचा गैरवापर करत स्वतंत्र काश्मीरच्या मागणीला प्रोत्साहन देण्याचा खोडसाळपणा करत आहे. सर्वात आधी हुंडाई कंपनीच्या पाकिस्तानातील शाखेने हा भारतविरोधी प्रकार केला. त्या पाठोपाठ केएफसी आणि आता पिझ्झा हट या कंपन्यांनीही हाच प्रकार सुरु केला आहे.

५ फेब्रुवारी रोजी काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा होत असताना हुंडाईच्या पाकिस्तानच्या शाखेने कुरघोडी करत एक पोस्ट व्हायरल करत काश्मीरला स्वातंत्र्य मिळावे, अशी मनोकामना केली होती. या कंपनीच्या ट्विटमध्ये ‘काश्मीर बंधू ज्यांनी काश्मीरसाठी प्राण दिले त्यांची आठवण काढूया आणि ते ज्या स्वतंत्र काश्मीरसाठी सतत झगडत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहुया’, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. त्या ट्विटमध्ये काश्मीर या शब्दाच्या भोवती तारेचे कुंपण दाखवण्यात आले आहे. या प्रकारचे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होताच जनक्षोभ उसळला आहे. आणि  Boycott Hyundai हा ट्रेंड सुरु झाला आहे. हजारो भारतीय आता हुंडाई कंपनीने माफी मागावी अशी मागणी केली.

hyundai

(हेही वाचा हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेकडून स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार! ‘Boycott hyundai’ ट्रेंड सुरू झाल्यावर धाबे दणाणले)

त्यानंतर केएफसी कंपनीच्याही ट्विटर अकाऊंटवरून ‘तुम्ही कधीच आमचा विचार संपवू शकत नाही. आम्हाला आशा आहे, येणारे वर्ष शांती प्रदान करेल, काश्मीर हा काश्मिरींचा आहे’, असे म्हटले आहे. तर पिझ्झा हटने त्यांच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर, काश्मिरी नागरिकांना उद्देशून ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’, असा संदेश दिला आहे.

https://twitter.com/go4avinash/status/1490684055272439810?s=20&t=q1oV0p8vVkXKo4XlC9EiNA

सोशल मीडियावर उमटले पडसाद

अंशुल सक्सेना यांनी ट्विट करून म्हटले की, पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सोशल अकाऊंट वापरून स्वतंत्र काश्मीरच्या विचारांना जोर देत आहे. याबाबतचे सर्व मेल, सोशल मीडियावरील पोस्ट आम्ही सरकारला पाठवले आहे, अशा ११ कंपन्या आहेत.

तर तर अनिष्का अग्रवाल हिने ट्विट करत, केएफसी सुद्धा…हा कुठल्या तरी मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. आधी हुंडाई, नंतर पिझ्झा हट आणि आता केएफसी, अजून किती असतील माहीत नाही…

(हेही वाचा कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबवर आग्रहीच! वाद पेटला, ड्रेस कोडची ऐशी तैशी
)

नेटकरी परमजीत सिंग यांनी ट्वीट करत म्हटले की, हे मोठे षडयंत्र आहे. अचानक सगळे स्वतंत्र काश्मीरसाठी पोस्ट करत आहेत. भारत सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.