मुंबई-गोवा महामार्गावरील विश्राम घाटात दरड कोसळल्याने, तासाभरापासून वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. डोंगराचा काही भाग आणखी घळण्याची भीती असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
अचानक दरड कोसळली
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर डोंगराचा काही भाग आणखी घसण्याची भीती असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. काम करत असताना कापलेल्या डोंगरातून अचानक दरड कोसळली. त्याचा भराव थेट तेथे काम करणा-या जेसीबीवर आल्याने हा जेसीबी ढिगा-याखाली अडकला आहे.
(हेही वाचा :“मैने दोनो को मुक्ती दिलाई ” ८९ वर्षाच्या वयोवृद्धाने केले हे भीषण कृत्य…)
वाहतूक ठप्प
जेसीबीमध्ये दोन कामगार अडकले होते यातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, डोंगरावरील भराव खाली येण्याची शक्यता असल्याने परशुराम घाटातील वाहूतक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community