अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर विराजमान झाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या यादीत गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले असून जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांनी 10 वे स्थान पटकावले आहे.
एलोन मस्क पहिल्या स्थानावर
टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती $235 अब्ज आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस दुसऱ्या स्थानावर तर फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड आरनॉल्ट तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
गौतम अदानी यांची किती आहे संपत्ती
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $88.5 अब्ज आहे. अशा प्रकारे त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 11व्या स्थानावर आणले आहे. कारण मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सध्या $87.9 अब्ज आहे. अशा प्रकारे ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या यादीतही गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. तर गौतम अदानी यांनी ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये प्रथमच 10 वे स्थान पटकावले आहे.
(हेही वाचा – मोठी बातमी! परशुराम घाटात कोसळली दरड, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प)
गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ
गेल्या वर्षापासून गौतम अदानी यांच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समधून त्यांचे नाव समोर आल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे. या वर्षातील कमाईच्या बाबतीत अदानीची एकूण संपत्ती $12 बिलियनपेक्षा जास्त वाढली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये यंदा मोठी घसरण झाली असून यासह इतर काही कारणांमुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत $2.07 बिलियनची घट झाली आहे. यामुळे ते 10 स्थानावरून 11व्या स्थानावर आले आहेत. या यादीत फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग13 व्या स्थानावर आहे.