“सोमवारी दरोड्याची योजना आखली होती, परंतु ऐनवेळी ही योजना बदलली आणि चार दिवसांपूर्वी दरोडा टाकला आणि आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी रक्कम हाती लागली”, अशी माहिती मुलुंड दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीनी पोलिसांना दिली आहे.
शनिवार आणि रविवार मिळून अंगाडीयाकडे मोठी रोकड जमा होत असते ती रक्कम सोमवारपर्यंत कार्यालयात असते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. सोमवारी दरोडा टाकला तर अंदाजे दोन ते तीन कोटी आमच्या हाती लागेल म्हणूनच आम्ही सोमवारी दरोडा टाकण्याची योजना आखली होती. परंतु दरोड्याचा सर्व तयारी मंगळवारी झाली, तीन वाहने, सहा पिस्तुल आणि रिव्हॉलवर हाती आले होते. सर्वांची वाट पहात बसलो असतो तर कदाचित दरोड्यापूर्वीच पकडले गेलो असतो. म्हणून आम्ही सोमवारची वाट न पहाता बुधवारीच दरोडा टाकला, अशी महिती मुलुंड पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या सात दरोडेखोरांनी पोलिसांना दिली आहे.
काय घडला नेमका प्रकार
मुलुंड पश्चिम येथील व्ही. एन. पटेल फार्म या अंगाडीयाकडे टाकण्यात आलेल्या ७० लाखाच्या सशस्त्र दरोड्याच्या गुन्ह्यातील आठ दरोडेखोरांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सात जणांकडून ३७ लाख रुपयांची रोकड, दरोड्यात वापरण्यात आलेली तीन वाहने आणि ४ पिस्तुल, २ देशी कट्टे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सात जनांपैकी एक जण उत्तर प्रदेश जोनपूर येथील सराईत गुन्हेगार आहेत. त्याने शस्त्र आणि वाहनाची व्यवस्था केली होती. या टोळीला या दरोड्यात २ ते ३ कोटी तरी मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यातून प्रत्येकाला आपला वेगळा व्यवसाय सुरू करायचा होता मात्र दरोड्यात लुटलेली रक्कम बघून सर्वांच्या अपेक्षा भंग झाल्या.
(हेही वाचा – मुकेश अंबानींना मागे टाकत ‘ही’ व्यक्ती बनली आशियातील सर्वात श्रीमंत!)
दरोड्यातील १० लाखाची रक्कम तर केवळ ही योजना आखण्यासाठी आणि शस्त्र विकत घेण्यासाठी खर्च झाले होते. त्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला तुटपुंजी रक्कमच लागली होती. ही रक्कम दरोड्याचा दिवशीच नवी मुंबई येथे वाहणातच समान वाटून घेऊन प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघून गेले होते. मुलुंड पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन या गुन्ह्याच्या शोधासाठी १२ पथके तयार करण्यात आले होते.
अशी आहेत ७ दरोडेखोरांची नावं
या पथकाने ४८ तास अहोरात्र मेहनत करून विविध शहरातून ७ जणांना अटक केली. मनोज काळे (३२), निलेश चव्हाण (३४), निलेश सुर्वे (२३), बिपिन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू (३४), रत्नेश उर्फ अनिल कुमार सिंग (२५), दिलीप शिवशंकर सिंह (२३) आणि वशीउल्ला किताबुल्ला चौधरी (४०) असे अटक करण्यात आलेल्या ७ जणांची नावे आहेत. ठाणे, नवीमुंबई, रायगड, युपी, सुरत आणि डोंबिवली परिसरात राहणारे आहेत. गुन्ह्याचा संपूर्ण तपास पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथम्बिरे, पोलिस निरीक्षक दिलीप धामुनसे, सपोनि संतोष कांबळे, पोउपनी शरद बागल, पोउपनी प्रकाश काळे, पोउपनी मुलानी, पोउपनी पंडित सोनवणे आणि पथके यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community