नेहरूंनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!

157

गोवा मुक्तीसाठी तेव्हा जर सरदार वल्लभभाई पटेल यांची रणनीती स्वीकारली असती, तर गोवा मुक्त होण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली नसती, पण नेहरूंना त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतीदूत प्रतिमा खराब करून घ्यायची नव्हती, म्हणून त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामातील क्रांतीकारकांवर परकीयांकडून अत्याचार होऊ दिले, गोव्यातील जनतेला त्यांनी पारतंत्र्यात ठेवले, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

काँग्रेसने गोव्यातील जनतेला १५ वर्षे गुलामगिरीत ठेवले

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी बोलत होते. गोवा मुक्तीसाठी अनेक सेनानी गोव्यात झगडत होते, त्यांच्यावर परकीय आक्रमणकर्ते गोळ्या झाडत होते. मात्र केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी ‘मी गोव्यात सैन्य पाठवणार नाही’, अशी भूमिका घेतली. ज्यामुळे आपल्याच स्वतंत्र भारतात गोव्यातील जनतेला १५ वर्षे गुलामगिरीत रहावे लागले, अत्याचार सहन करावे लागले होते, हे गोव्याची जनता कधीही विसरणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

(हेही वाचा हुंडाई, केएफसी आता पिझ्झा हट…स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार सुरूच)

नेहरूंनी स्वतंत्र भारतात गोव्यातील जनतेला वा-यावर सोडले

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळीचे तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला. त्यावेळी नेहरू म्हणाले होते की, जे लोक क्रांतीकारक म्हणून गोव्यात जात आहेत, त्यांनी क्रांतीकरक होण्याचे परिणाम समजून घ्यावेत, क्रांतीकारकांच्या पाठिशी सैन्य नसते. मी कदापी सैन्य पाठवणार नाही, असे म्हणत नेहरूंनी स्वतंत्र भारतात गोव्यातील जनतेला वा-यावर सोडले होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले.

वीर सावरकरांची कविता म्हटली म्हणून केली गच्छंती 

काँग्रेसने गोव्यातील सुपुत्रावरही अन्याय केला आहे, असे सांगत मोदींनी पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांचा अनुभव कथित केला. भारतरत्न स्व. लता दीदी त्यांच्या कुटुंबासोबत गोव्यात राहत होते. त्यावेळी त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर हे आाकशवाणीत होते. त्यावेळी त्यांनी वीर सावरकर यांची कविता रेडिओवरून म्हटली, ज्यामुळे त्यांची अॉल इंडीया रेडिओतून हकालपट्टी केली होती, अशीही आठवण मोदींनी करवून दिली. काँग्रेसने विचार स्वातंत्र्याला पायदळी तुडवले आहे. नेहरूंवर टीका केली म्हणून वर्षभर मजरूह सुल्तानपुरी यांना जेलमध्ये टाकले. सीताराम केसरी यांचे काय झाले, हे सगळ्यांना ठाऊक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

(हेही वाचा कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबवर आग्रहीच! वाद पेटला, ड्रेस कोडची ऐशी तैशी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.