महाभारत मालिकेत भीम ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले असून ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झुंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. महाभारत मालिकेत त्यांनी साकारलेल्या भीम या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
प्रवीण कुमार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऍथलिट
प्रवीण कुमार सोबती यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘शहेनशाह’ या चित्रपटात त्यांनी मुख्तार सिंग ही भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी ‘करिश्मा कुदरत का’, ‘युद्ध’, ‘जबर्द’, ‘खुदगर्ज’, ‘लोहा’, ‘मोहब्बत के दुश्मन’, ‘इलाका’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रवीण कुमार हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ऍथलिट देखील होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक पटकावले होते. तसेच त्यांनी 2 वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – मुकेश अंबानींना मागे टाकत ‘ही’ व्यक्ती बनली आशियातील सर्वात श्रीमंत!)
वयाच्या 72 व्या वर्षी हालाखीचे जीवन
लॉकडाऊनमध्ये या सर्व मालिकांचे पुन:प्रसारण केल्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. मात्र, या कलाकारांची ओळख आजही कायम आहे. वयाच्या 72 व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती अत्यंत हालाखीचे जीवन जगत होते. वयोमानानुसार, काम करु शकत नसल्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
Join Our WhatsApp Community