मुंबईतील मंजूर शौचालयांमधील ३,२१८ शौचकुपांची कामे गुंडाळली!

135

मुंबईमध्ये तीन वर्षांपूर्वी टप्पा ११ अंतर्गत २२, ७७४ शौचकुपे बांधण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात ही कामे सप्टेंबर २०२१ कामे पूर्ण व्हायला हवी होती, परंतु ही कामे वेळीच न झाल्याने अखेर या कामाला मे महिन्यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली असून आतापर्यंत केवळ ३६ टक्केच शौचालय उभारणीचे काम पूर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे या मंजूर केलेल्या शौचकुपांच्या उभारणींपैकी ३,२१८ शौचकुपांची कामे वगळण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

मे २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०१८-१९ मध्ये स्थायी समितीच्या मंजुरीने २२,७७४ शौचकुपे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने टप्पा ११ अंतर्गत बी व सी विभाग वगळता उर्वरीत २२ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये ११८ शौचालयांमध्ये २२,७७४ शौचकुपे बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या मंजूर कामांमधील ६३३ शौचालयांमध्ये १४,४४९ शौचकुपांचे म्हणजे ६३.४ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तसेच १९६ शौचालयांमधील ५,१०७ शौचकुपांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे २२.४ टक्के काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे एकूण २२,७७४ शौचकुपांपैकी १९,५५६ शौचकुपांचे काम पुढील तीन महिन्यांमध्ये अर्थात मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – मुकेश अंबानींना मागे टाकत ‘ही’ व्यक्ती बनली आशियातील सर्वात श्रीमंत!)

मात्र, या २२,७७४ शौचकुपांपैंकी एकूण ३,२१८ शौचकुपांचे बांधकाम हे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची बांधणी, जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच विभागीय स्तरावरील अडचणी यामुळे करता येणे शक्य नसल्याचेही घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. ही सर्व कामे सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु परंतु परिमंडळांचे उपायुक्तांच्या मंजुरीने उर्वरीत कामे मे २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आजवर सुमारे १२ कोटींचा शासनाकडून निधी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाकडून सामुदायिक शौचालय बांधकामाकरता २०१५ मध्ये २.८८ कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता, या निधीचा वापर टप्पा १० मधील शौचालयांच्या उभारणीकरता खर्च करण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ९.३ कोटी रुपये एवढा निधी प्राप्त झालेला असून याचा वापर टप्पा ११ अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांकरता खर्च करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.