तिस-या लाटेच्या तडाख्यात गेल्याच महिन्यात साडेतीन लाखापर्यंत पोहोचलेल्या रुग्णांची संख्या आता एक लाखांच्या खाली नोंदवली गेली. मंगळवारी राज्यातील विविध भागांत केवळ ९६ हजार ६९ कोरोनाचे रुग्णांवर उपचार सुरु होते. तिसरी लाट ही ओमायक्रॉन विषाणूमुळे आल्याने आरोग्य विभागाने तपासणीवर भर कायम ठेवला आहे.
जाणून घ्या कुठे किती रूग्णांची झाली नोंद
एका दिवसांत राज्यभरातील विविध भागांत ४३८ ओमायक्रॉन विषाणूच्या तपासणीसाठी जनुकीय चाचण्या केल्या गेल्या. मात्र राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत केवळ मुंबईत ४४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. नागपूरात मंगळवारी ४२३ तर पुण्यात ९६१ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्याही केवळ ८५ वर नोंदवली गेली. नाशकातही रुग्णसंख्या २०३, अहमदनगरमध्ये ८० नवे रुगण आढळले.
० मंगळावरी राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची नवी नोंद – ६ हजार १०७
० मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रुग्णांची संख्या – १६ हजार ३५
० राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण – ९६.८९ टक्के
० मंगळवारी मृत्यू पावलेल्या कोरोनाची संख्या – ५७
० राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ७५ लाख ७३ हजार ६९
० राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या – ७८ लाख १६ हजार २४३
Join Our WhatsApp Community