अरे बापरे… राज्यात आता बिबट्या पकडायला ‘ही’ शिकारी जमात!

120

देशभरात वाघांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या बहेली जमातीच्या शिका-यांनी साता-यात बिबट्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बहेली जमातीकडून खास पद्धतीने वापरल्या जाणा-या फास्यात बिबट्या अडकला मात्र स्थानिकांच्या सजगतेने बिबट्याच्या किंकाळ्या वनविभागापर्यंत पोहोचल्या आणि बिबट्याची सुखरुप सुटका झाली. गावक-यांनी बिबट्याच्या किंकाळ्या ऐकताच घटनास्थळी धाव घेतल्याने या भागांतून शिकारी नाहीसे झाले. पश्चिम महाराष्ट्रात बहेली जमातीकडून बिबट्याच्या शिकारीची उघड झालेली ही पहिली घटना आहे.

पशुवैद्यकीयांकडून बिबट्यावर तातडीने उपचार

मांजर कुळातील प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणा-या फास्यात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास नऊ महिन्यांचा बिबट्याचा बछडा अडकला. स्थानिकांकडून पोलिसांना माहिती मिळताच वनविभागाशी संपर्क होताच अर्ध्या तासाच वनविभागा घटनास्थळी दाखल झाले. पिंजरा बिबट्याजवळ नेत त्याला पिंज-यात ठेवले गेले. मात्र बछड्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली. पशुवैद्यकीयांच्या मदतीने बिबट्यावर तातडीने उपचारही केले गेले.

फास्याची पद्धत पाहता या भागांत बेहली ही शिका-यांची जमात या भागांत फिरत असल्याचे वनअधिका-यांच्या लक्षात आले. कुत्र्यांच्या मदतीने जागेची तपासणी केली गेली. वनविभागाने स्थानिकांचीही विचारपूस केली. सायंकाळी साता-यातील कराड येथील गोपाळनगर कार्वे येथे राहणा-या बाबूराव जाधव (४५) या इसमाला संशसित आरोपी म्हणून वनविभागाने ताब्यात घेतले. आपण बिबट्या पकडण्यासाठी फासा लावल्याची कबूली आरोपीने दिली.

फास्याची पद्धत लक्षात घेता बहेरी जमातातील आरोपी या कटात सामील असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती सातारा वनविभागाच्या कराड भागांतील वनपरिक्षेत्रपाल तुषार नवले यांनी दिली. वन्यजीव गुन्ह्यासंदर्भात कोणाला माहिती द्यायची असल्यास १९२६ या हेल्पलाईन नंबरवर फोन करण्याचे आवाहन वनविभागाने केले.

जाणून घ्या बहेली जमातीबद्दल…

बहेली ही स्थलांतरित जमात आहे. राजस्थान, हरयाणा, मध्यप्रदेशांत बहेली जमातीचा वावर दिसून येतो. प्रामुख्याने देशाच्या सीमांतर्गत भागांत बहेली जमात राहतात. वाघाची शिकार करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. खेडेगावात राहायला आल्यानंतर लोहारकामापासून छोटीमोठी कामे करत बहेली जमात उपजीविका करते. शिकारीची संधी मिळाल्यास स्थानिक वन्यप्राण्याला फास्यात अडकवून मारुन टाकते.

बहेली जमात शिकारीतील मांस खात नाही. वन्य प्राण्याच्या कातडीची विक्री करते. केवळ सहा माणसांच्या बळावर शिकाराची योजना आखली जाते. वन्यप्राणी अडकल्यानंतर प्राण्याला मारण्याचे आणि पाऊण तासाच घटनास्थळावरुन पोबारा करण्याचे प्रशिक्षण महिलेला दिले जाते. एका ठराविक ठिकाणी गटातील प्रमुख माणसे जमल्यानंतर वन्यप्राण्याची कातडी शरीरापासून वेगळी काढली जाते. प्राण्याची कातडी पोटावर गुंडाळून महिला आपण गर्भवती असल्याचे सांगत गटातील वयस्कर महिलेच्या मदतीने गुन्ह्याच्या जागेपासून लांब पळून जाते. कालांतराने विक्रीचा व्यवसाय ठरतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.