आमदार अमित साटम यांनी संजय राऊत यांना दिले आव्हान! म्हणाले…

106

नेहमीप्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे नेते यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. राऊत यांना आता भाजपचे मुंबईतील नेते आव्हान देऊ लागले. कालपर्यंत सौज्वळ भाषेत राऊतांना उत्तर देणारे भाजपचे नेते मंडळी आता मनगटाची भाषा करून शिवसेनेच्या भाषेतच उत्तर देऊ लागले आहेत. यामध्ये आता आमदार अमित साटम यांची भर पडली आहे.

काय म्हणाले अमित साटम?

जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही, घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगले माहीत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरिट भाईंवर भेकड हल्ले करायचे. आणि आता प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्यासारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे. जय जिजाऊ, जय शिवराय!

(हेही वाचा २०२४साठी मोदी सरकारचा काय असणार मास्टर स्ट्रोक? जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.