आसाम पोलिसांनी आज, बुधवारी 1477 किलो अंमली पदार्थांची होळी केली. कोकराझार येथे होळी करून मोठ्या प्रमाणात गांजा, हेरॉईन आणि इतर अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
(हेही वाचा – घार ठेवली हॉटेलमधील पिंज-यात, गि-हाईकाने आणले वनविभागाला दारात!)
Supervised the burning of dangerous Narcotics today as @KokrajharPolice destroyed
1477 Kg Ganja, 1.28 Kg Heroin & 33 tablet packets. Leaving no stone unturned, we’re committed to creating a #DrugsFreeAssam under the towering leadership of HCM @himantabiswa sir. @assampolice pic.twitter.com/D4GgRv7zat— Dr L R Bishnoi, IPS (@lrbishnoiips) February 8, 2022
कोकराझारमध्ये विविध ठिकाणी कारवाई
आसामच्या कोकराझारमध्ये पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत आतापर्यंत 1477 किलो गांजा, 1.28 किलो हेरॉईन आणि 33 अमली पदार्थाच्या गोळ्यांची पाकिटे जप्त केली होती. इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेले विविध प्रकारचे ड्रग्ज नष्ट करण्यासाठी पोलिसांना खुल्या मैदानात मोठी होळी करावी लागली. हे ड्रग्ज नष्ट करण्यासाठी पोलिसांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
खुल्या मैदानात गांजाची होळी
गांजाबरोबरच हेरॉईन आणि अमली पदार्थाच्या गोळ्या देखील जाळण्यात आल्या. खुल्या मैदानात हा गांजाच्या होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोकराझार पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community