प्रियंका गांधी झाल्या ट्रोल! #Bikini का सुरु झाला ट्विटर ट्रेंड

133

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालून येतात, त्याविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन होत असताना यात आता काँग्रेसने उडी मारली आहे. हिजाबचे समर्थन करताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भलतेच ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी मुलींना बिकिनी घालून फिरण्याचेही स्वातंत्र्य आहे, अशा आशयाचे हे ट्विट व्हायरल होताच त्या सोशल मीडियात चांगल्याच ट्रॉल होत आहेत. ट्विटरवर तर #Bikini हा ट्रेंड सुरु झाला आहे.

काय केले आहे प्रियंका गांधी यांनी ट्विट?

प्रियका गांधी यांनी त्यांचे ट्विट केल्यावर तासाभरातच त्यांच्यावर टीकेची झोड उगारणारे ट्विट येऊ लागले. अनेकांनी प्रियंका गांधीच्या ट्विटवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या. #ladkihoonladsaktihoon अर्थात मी मुलींसोबत आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं. पण त्यांनी केलेल्या हॅशटॅगऐवजी भलताच टॅग ट्रेन्ड होऊ लागला. अचानक ट्विटरवर #Bikini या शब्दावरुन असंख्य ट्विट्स पडले आहेत. प्रियंका गांधी यांनी, बिकिनी असो वा घुंगट, जीन्स असो व हिजाब, काय घालावे याचा निर्णय घेण्याचा अधिकार महिलांचा आहे. तो त्यांना भारतीय संविधानाने दिला आहे. महिलांची छळवणूक थांबवा. #ladkihoonladsaktihoon

(हेही वाचा २०२४साठी मोदी सरकारचा काय असणार मास्टर स्ट्रोक? जाणून घ्या…)

प्रियंका गांधींवर टीका करणाऱ्या ट्विटचा महापूर!

त्यावर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवणारे ट्विट येऊ लागले आहेत. सनी समान्था यांनी प्रियंका गांधींच्या ट्विटवर म्हटले की, गांधींच्या ट्विटमध्ये घुंगट सोबत जीन्स आणि हिजाबच्या बाजूने बिकिनी शब्द असला पाहिजे होता. तुम्ही उलट केले आहे. यातूनच तुमची मानसिकता दिसून येते. त्यावर रोहित ठाकूर यांनी उत्तर देताना म्हटले कि, कारण त्या मुली शाळेत बिकिनी घालूनही येऊ शकतात, हे दाखवून देत आहेत. त्या शाळा आणि वैयक्तिक जीवन यात फरक करत नाहीत, असे म्हटले आहे.

वैशाली मिश्रा म्हणतात, इटलीमध्ये शाळेत बिकिनी घालायला परवानगी आहे का?

अमित म्हणतात कि, तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब घातला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, परंतु प्रत्येक शाळेचा ड्रेस कोड असतो. शाळेत सर्व धर्मातील विद्यार्थी येत असतात. त्यामुळे सर्वाना समान नियम असतात. तुम्हाला ते मान्य केले नाही तर तुम्हाला शिक्षा केली जाते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.