मुंबईत लता दिदींच्या नावाने होणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय!

105

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना कॅम्पस येथे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रीगटाच्या बैठकीत घेतला आहे. आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाला लता दीदींचे नाव देण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

असे असणार महाविद्यालय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लतादीदींना पहिली श्रद्धांजली वाहण्यात आली, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 9 फेब्रुवारी रोजी पत्रकारांना दिली. यानंतर मंत्रिगटातील सर्व सदस्यांनी एकमताने कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या आवारात तीन एकर जागेवर भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा – लोअर परळच्या पुलाचे काम कुणामुळे रखडणार?)

राज्य सरकारने विदयापीठाकडे तीन एकर जागा मागितली

उदय सामंत यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता मुंबई विद्यापीठ परिसरातच कलिना येथे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल स्कूल ऑफ म्युझिकची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ते त्यात खूश आहेत. त्यांनी स्वतः मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. सामंत यांनी सांगितले की, राज्य सरकारने मुंबई विदयापीठाकडे तीन एकर जागा मागितली होती, ती मिळाली आहे, त्यामुळे या कामात कोणताही अडथळा नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.