तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही! राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

116

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानानंतर भाजपा नेत्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर हल्लाबोल केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊंताना आपले नेहमीच्या शैलीत उत्तर दिले आहे. शिवसेना फक्त मातोश्रीपुरतीच दादा आहे. त्यामुळे तुम्ही संजय राऊत तुम्ही धमक्या देणं बंद करा, तुमच्या धमक्यांना भाजपावाले भीक घालत नाहीत, अशा शब्दांत राणेंनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

काय आहे राणेंचे ट्वीट?

शिवसेना मुंबईचा दादा असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. पण ती फक्त मातोश्रीपुरतीच दादा आहे. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस आता संपले आहेत. तुमची जागा बाहेर नाही आता आत आहे. तेव्हा धमक्या देणे बंद करा, कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना भाजपवाले तर नाहीच नाही, अशा शब्दांत नारायण राणेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवला आहे.

(हेही वाचाः आमदार अमित साटम यांनी संजय राऊत यांना दिले आव्हान! म्हणाले…)

काय होते राऊतांचे वक्तव्य?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचे विधान केले असून आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना दिला होता.

(हेही वाचाः ‘शेर कभी गीदडों की धमकीयों से…!’, फडणवीसांचा राऊतांवर पलटवार)

सिंह गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही- फडणवीस

यावेळी फडणवीस म्हणाले की, ईडी काय करते ते ईडी सांगेल, मला असं वाटतं की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे वक्तव्य त्याचाच भाग आहे. राऊतांनी त्यांचे मत न्यायालयात मांडावं, रोज सकाळी ९ वाजता येऊन संजय राऊत मनोरंजन करण्याचे काम करत असतात. त्याच्यापेक्षा त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ शकत नाही. त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही त्यांनी न्यायालयात जावं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.